आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शॉकिंग:डिप्रेशनमध्ये आहे भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी, म्हणाली - 'जर हे असेच सुरु राहिले तर माझ्याजवळ आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील आठ वर्षांपासून मानसिक त्रास देतेय एक व्यक्ती
  • खतरों के खिलाडी 10 मध्ये झळकली होती

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी सध्या आयुष्यातील वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या आठ वर्षांपासून धनंजय सिंह नावाची व्यक्ती आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप राणीने केला आहे. जर हे असेच सुरु राहिले तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय तिच्याजवळ राहणार नसल्याचे तिने म्हटले आहे.  याविषयीची एक फेसबुक पोस्ट तिने टाकली आहे. 

राणी चॅटर्जीची फेसबुक पोस्ट 

राणीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, 'डिप्रेशनमुळे मी आता खूप अस्वस्थ आहे. बर्‍याचदा मी कणखर आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला, पण आता मला शक्य होत नाही. हा माणूस माझ्याबद्दल फेसबुकवर बर्‍याच वर्षांपासून वाईट-साईट लिहित आला आहे. मी बऱ्याच वेळा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मी बर्‍याच लोकांशी बोलले, प्रत्येक जण म्हणाला की दुर्लक्ष करा, परंतु मीसुद्धा माणूस आहे. मी जाडी आहे, मी म्हातारी आहे, मी काही काम केलं, की हा इतकं घाणेरडं लिहितो. सर्व जण मला हे पाठवतात आणि म्हणतात की दुर्लक्ष कर. पण आता इग्नोर नाही होऊ शकतं.”

  • पोलिसांकडे केली विनंती 

ती पुढे लिहिले, 'याबद्दल बर्‍याच वर्षांपासून मी खूप अस्वस्थ आहे. मी मानसिक ताणतणावातून जात आहे. मी जीव द्यावा, अशी बहुधा याची इच्छा आहे. यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप तणाव आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करते, की जर मी वाकडे पाऊल उचलले, तर त्यासाठी जबाबदार धनंजय सिंह असेल.” असा थेट इशारा तिने दिला आहे.

  • मी हतबल झाले आहे

याबद्दल मी सायबर सेलमध्येही तक्रार केली होती, पण त्यांनी असे म्हटले होते की याने माझे नाव लिहिले नाही. परंतु मला माहित आहे की ते फक्त माझ्यासाठीच लिहिले जाते. कारण अशा पोस्टवर इतर लोक माझे नाव लिहितात आणि घाणेरड्या शिव्या देतात. आणि हा त्याचा आनंद घेतो. मी हतबल झाले आहे, आता माझ्यात हिम्मत नाही. एकतर मी आत्महत्या केली पाहिजे. कारण मी बर्‍याच वर्षांपासून खूप वाईट मानसिक अवस्थेतून जात आहे. आणखी सहन होत नाही. #सुसाईड' असे राणीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

0