आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक!:कोरोनाने घेतला 33 वर्षीय अभिनेता-गीतकार श्याम देहातीचा बळी, रुग्णालयात जाताना ऑक्सिजनची पातळी खालावल्याने वाटेतच झाला मृत्यू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि गीतकार श्याम देहाती यांचे निधन झाले आहे. ते 33 वर्षांचे होते. बिहारच्या बेतिया येथील ते रहिवासी होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रविवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णवाहिकेने बेतियाहून गोरखपूर येथे नेले जात होते. पण वाटेत ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन मुलांचे वडील होते श्याम देहाती

श्याम देहाती विवाहित होते. त्यांना एक 5 वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्च्यात बायको आणि मुलांसह आईवडील आहेत. गायक आणि अभिनेता खेसारीलाल यादव यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, "शर्थीचे प्रयत्न करुनदेखील आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो नाही. हा मेसेज शेअर करताना खूप दुःख होत आहे. भावा तू आता या जगात नाही, पण तू लिहिलेल्या प्रत्येक गाण्याच्या माध्यमातून तू कायमच आमच्यातच असशील," अशा शब्दांत खेसारीलाल यादवने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लिफ्टमॅनहून झाले होते गीतकार
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक ए. एन सिंह यांनी सांगितले, श्याम देहाची सुरवातीच्या काळात रोजगाराच्या शोधात मुंबईला आले होते, येथे त्यांना लिफ्टमॅनची नोकरी मिळाली होती. ज्या बिल्डिंगमध्ये ते लिफ्टमॅन म्हणून काम करायचे तिथे चित्रपट निर्मात्यांचे येणेजाणे असायचे. बरेच बिहारी चित्रपट निर्मातेही तिथे यायचे. याच काळात ते ‘निरहुआ रिक्शावाला’ चे दिग्दर्शक केडी यांच्या संपर्कात आले आणि त्यांना चित्रपटात गाणे लिहिण्याची संधी मिळाली.

2007 मध्ये गीतकार म्हणून केले होते पदार्पण
2007 मध्ये 'निरहुआ रिक्शावाला' चित्रपटाद्वारे श्याम यांनी गीतकार म्हणून भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. डझनभर चित्रपटांसाठी गाणी लिहिल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये संगीत देण्याचे कामही केले. तीन वर्षांपूर्वी ते 'रानी दिलबर जानी' या चित्रपटात नायक म्हणून झळकले. या चित्रपटात भोजपुरी इंडस्ट्रीच्या आठ मोठ्या नायिकांनी एकत्र काम केले होते. त्यामध्ये राणी चॅटर्जी, पाखी हेगडे, मोनालिसा, अंजना सिंह, अर्चना सिंह, सीमा सिंह आणि आम्रपाली दुबे यांचा समावेश आहे.

नुकताच नमकीनचा व्यवसाय सुरू केला होता

'रानी दिलबर जानी' या चित्रपटाद्वारे इतर भोजपुरी गायक आणि गीतकारांसारखे आपले मोठे नाव होईल, अशी त्यांना आशा होती, मात्र त्यांना या चित्रपटातून यश मिळाले नाही. मागील दीड वर्षांपासून श्याम देहाती अडचणीत होते, असे सांगितले जाते. त्यांनी अलीकडेच नमकीनचा व्यवसाय सुरु केला होता.

बातम्या आणखी आहेत...