आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोजपुरी सुपरस्टारचा वाढदिवस:अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले होते निरहुआचे बालपण, वडील करायचे मोलमजुरी, आता मुलगा एका चित्रपटासाठी घेतो 50 लाख रुपये!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत जुळले नाव

भोजपुरी सुपरस्टार निरहुआचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 फेब्रुवारी 1973 रोजी गाजीपुरच्या टंडवा गावात त्याचा जन्म झाला. तो लहान असताना त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. गाजीपुरच्या एका छोट्याशा गावातील निरहुआ आज भोजपुरी स्टार बनला आहे. निरहुआचे खरे नाव दिनेशलाल यादव आहे.

वडील करायचे मोलमजुरी
एकेकाळी निरहुआच्या वडिलांचा महिन्याची पगार फक्त 3500 रुपये होते आणि यामध्ये 7 लोकांचे कुटूंब चालत होते. पैसे कमावण्यासाठी त्याचे वडील दोन मुलांना घेऊन कोलकत्याला गेले. या काळात त्यांनी पत्नी आणि तीन मुलींना गावातच सोडले होते. कोलकातामध्ये ते एका झोपडपट्टीमध्ये आपल्या दोन मुलांसोबत राहिले. या काळात मोलमजूरी करुन ते 3500 रुपये कमावत होते. निरहुआचे प्राथमिक शिक्षण कोलकाता येथेच झाले.

हलाखीची परिस्थिती असूनही वडिलांनी शिकवले
मोलमजुरी करुन निरहुआच्या वडिलांनी त्याला शिकवले. निरहुआने कोलकाताच्या एका कॉलेजमधून बीकॉमचे शिक्षण घेतले. परंतु निरहुआला संगीताची आवड होती. निरहुआने नोकरी करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, मात्र त्याला अभिनयात करिअर करायचे होते. शिक्षणानंतर, निरहुआ 2001 मध्ये त्याच्या गावी परतला आणि संगीताचा रियाज त्याने सुरु केला. त्यानंतर त्याने 'निरहुआ सेटल रहे...' हा अल्बम आणला जो हिट ठरला.

यानंतर 'ससुरा बडा पइसावाला'चे निर्माता सुधाकर पांडे त्याच्या गावी आले आणि त्यांनी या गाण्याचे कौतुक केले. येथेच निरहुआला मोठी संधी मिलाली. सुधाकर पांडे यांनी त्यांच्या 'मुसाफिर मोह लियो' या चित्रपटासाठी निरहुआला साइन केले. यानंतर, निरहुआने मागे वळून पाहिले नाही आणि आतापर्यंत त्याने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकेकाळी त्याच्या घरी सायकलही नव्हती. आता भोजपुरी स्टार बनल्यानंतर तो एका चित्रपटासाठी तब्बल 50 लाख रुपये मानधन घेतो.

20 रु. चे तिकीट घेऊन विमान पाहण्यासाठी पोहोचला होता निरहुआ
काही वर्षांपूर्वी निरहुआने सोशल मीडियावर कोलकाता एअरपोर्टवरील एक फोटो शेअर करुन बालपणीची घटना सांगितली होती. तो म्हणाला होता, "मी आठवीत होते, त्या दिवशी मी खुप आनंदी होतो, कारण पापा 20 रु.चे तिकीट घेऊन दम दम एयरपोर्टवर प्लेन दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. आम्ही आनंदात एयरपोर्टवर पोहोचले. परंतू तिथे पोहोचून खुप दुःखी झालो. तिथे पोहोचल्यावर कळाले की, आता ती सुविधा बंद झाली होती."

निरहुआने पुढे लिहिले होते, "विमान न पाहता घरी परतल्यामुळे मला खुप राग आला. याला काय अर्थ आहे, गरीब व्यक्ती विमानात बसू शकत नाही, कमीत कमी ते पाहण्याची सुविधा तरी बंद करायला नको होती. तेव्हा वडील म्हणाले होते की, जर तू प्रामाणिकपणे मेहनत केली, तर एक दिवस फ्लाइटने प्रवास करशील. वडिलांचे मार्गदर्शन आणि तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने आज त्याच एयरपोर्टवर बसलो आहे तर वडिलांची आणि त्यांच्या शब्दांची आठवण झाली," अशी आठवण त्याने सांगितली होती.

अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत जुळले नाव

2000 मध्ये निरहुआचे लग्न झाले. त्याच्या पत्नीचे नाव मंशा असून त्यांना आदित्य आणि अमित ही दोन मुले आहेत. निरहुआ आपल्या कुटुंबासह मुंबईत वास्तव्याला आहे. त्याची पत्नी कायम प्रसिद्धीपासून दूरच राहते. विवाहित निरहुआचे नाव भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत जुळले आहे. या दोघांनी कधीही आपल्या अफेअरच्या बातम्यांचे खंडन केलेले नाही. निरहुआने आम्रपाली दुबेसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...