आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस:'भोला'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, फक्त 7.40 कोटींची कमाई; व्यापार तज्ज्ञांचा दावा – IPL चा परिणाम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 11.20 कोटींचा गल्ला जमवत चांगली सुरुवात केली होती. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाला 7.40 कोटींवर समाधान मानावे लागले आहे.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचा 'भोला'च्या कमाईवरही परिणाम झाल्याचे व्यापार तज्ज्ञांचे मत आहे. रामनवमीमुळे चित्रपटाला चार दिवसांचा वीकेंड मिळाला. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला शनिवार आणि रविवारी आपला आकडा सुधारावा लागणार आहे.

रमजान आणि आयपीएल सुरू झाल्याने चित्रपटाला नुकसान झाले?
चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन शेअर करताना तरण आदर्श यांनी लिहिले, 'दुसऱ्या दिवशी भोलाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी रामनवमीची सुटी होती पण शुक्रवार हा कामाचा दिवस असल्याने चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला. दोन्ही दिवशी चित्रपटाचे एकूण कलेक्शन 18.60 कोटी आहे.'

रमजानच्या महिन्यात प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग चित्रपटांपासून दूर राहतो. शिवाय आयपीएल 2023 ची सुरुवात झाली असून त्याचाही परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर झालेला दिसून येतोय. आता वीकेंड आणि आगामी उन्हाळ्याच्या सुट्या चित्रपटासाठी फायदेशीर ठरणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजय देवगणमुळे तब्बू या चित्रपटात सामील झाली
अजय देवगण आणि तब्बूची जोडी प्रेक्षकांना आवडते. दोघांनी शेवटचे 'दृष्यम 2' या चित्रपटात एकत्र काम केले होते. भोला या चित्रपटासाठी का होकार दिला? असा प्रश्न माध्यमांनी तब्बूला विचारला होता.

पीटीआयला उत्तर देताना ती म्हणाला, 'मी डोळे मिटून या चित्रपटाला हो म्हणाले. चित्रपटाचा दिग्दर्शक अजय देवगणला मी शरण गेले. मला माहित होते की तो सर्वकाही सोपे करेल. खरं तर या लेव्हला मी अॅक्शन करु शकेल, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. पण अजय आणि त्याच्या टीमने मला खूप मदत केली आणि गोष्टी खूप सोप्या केल्या. अजय आणि त्याच्या टीममध्ये अॅक्शनचा जो दर्जा आहे, तो इतर कोणाकडे असेल असे मला वाटत नाही.'

खरं तर अजय आणि तब्बू खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात.

पहिल्या दिवशी चित्रपटाला 2023 ची तिसरी चांगली ओपनिंग मिळाली
नवीन वर्ष सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. मार्च महिना संपत आला आहे. आतापर्यंत फक्त तीन हिंदी चित्रपट आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने 55 कोटींसह इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली.

रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कार' 15.73 कोटींच्या कमाईसह वर्षातील दुसरा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. या यादीत आता 'भोला' तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

अजयच्या चाहत्यांना 'भोला'कडून मोठ्या अपेक्षा
गेल्या काही वर्षांत अजय देवगणचे चित्रपट सिल्व्हर स्क्रीनवर चांगली कामगिरी करत आहेत. मग तो 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' असो किंवा 'दृष्यम 2'... या दोन्ही चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच 1200 कोटी कमावणाऱ्या 'RRR' चित्रपटातही अजय देवगणची महत्त्वाची भूमिका होती.

अजय देवगण हा बॉलिवूडमधील अशा काही निवड अभिनेत्यांपैकी एक आहे जो डोळ्यांनी अभिनयासाठी ओळखला जातो. आता त्याच्या चाहत्यांना त्याच्या 'भोला' या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

'भोला' हा ड्रग सिंडिकेटवर आधारित 'कैथी' या चित्रपटाचा रिमेक
'भोला'चे दिग्दर्शन अजय देवगणने केले आहे. अशाप्रकारे अजय या चित्रपटाचा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. 100 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट लोकेश कनगराजच्या 2019 चा सुपरहिट चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. 'कैथी' हा चित्रपट ड्रग सिंडिकेटवर आधारित होता. कमल हसनचा 'विक्रम' देखील याच फ्रँचायझीचा एक भाग होता.

'कैथी'मध्ये मुख्य भूमिका अभिनेता कार्थीने साकारली होती. कार्थी हा दक्षिणेतील सुपरस्टार सूर्याचा भाऊ आहे.
'कैथी'मध्ये मुख्य भूमिका अभिनेता कार्थीने साकारली होती. कार्थी हा दक्षिणेतील सुपरस्टार सूर्याचा भाऊ आहे.