आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या रुपात मोठ्या पडद्यावर परतत आहे. होय, कार्तिकच्या गाजलेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वतः कार्तिकने 'भूल भुलैया 3' चा टिझर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी देत आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
कार्तिकने त्याच्या सोशल मीडियावरून 'भूल भुलैया 3'चा टिझर टिझर रिलीज केला आहे. या टिझरमध्ये कार्तिक रुह बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. कार्तिक म्हणतो की, "गोष्ट अजून संपलेली नाही... दरवाजे बंद केले आहेत जेणेकरुन ते पुन्हा उघडता येतील. मी फक्त आत्म्यांशी बोलत नाही तर आत्मे माझ्या आत येतात." टिझर पाहून कार्तिकचे चाहते आता 'भूल भुलैया 3'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
2024 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे
कार्तिक आर्यनच्या पोस्टनुसार, हा चित्रपट दिवाळी 2024 च्या आसपास रिलीज होईल. मागील चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाचेही दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. तर चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजच्या बॅनरखाली केली जात आहे.
ब्लॉकबस्टर ठरला होता 'भूल भुलैया 2'
कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली. कोरानाच्या काळात अनेक मोठे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, पण कार्तिकच्या चित्रपटाने दमदार कमाई केली. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता
'भूल भुलैया' फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते तर निर्मिती टी-सीरीजने केली होती. हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. अक्षय कुमारने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना खूप हसवले. त्याने साकारलेली व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अमिषा पटेल, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. याशिवाय चित्रपटातील परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी आणि असरानी यांची कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना आवडली होती. या चित्रपटातील मंजुलिकाच्या भूमिकेसाठी विद्या बालनला अनेक पुरस्कार मिळाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.