आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:भूमी पेडणेकरने तेरा लाखांचे कर्ज घेऊन फिल्म स्कूलमध्ये घेतला प्रवेश, नापास झाल्यानंतर केली होती नोकरी; म्हणाली -  माझे जीवन खूपच संघर्षात गेले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूमी पेडणेकरचे आई-वडील या क्षेत्रात आल्यामुळे खुश नव्हते.

भूमी पेडणेकरकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. ‘दुर्गावती’ची पूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे. तिच्याकडे राजकुमार रावसोबतचा ‘बधाई दो’ आणि ‘तख्त’सारखे चित्रपट आहेत. एका खास मुलाखतीत तिने आपल्या संघर्षाविषयी सांगितले...

भूमी सांगते, पाच वर्षे झाली आहेत तरीदेखील मला हे सर्व एखाद्या स्वप्नासारखे वाटत आहे. मी काही अॅक्सिडेंटल अभिनेत्री नाही हे मला वारंवार म्हणावे लागते. मला सुरुवातीपासूनच याच क्षेत्रात यायचे होते. अभिनयाच्या जगात येण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. माझा जन्म आणि पालनपोषण मुुंबईतच झाले आहे. याचा मला जास्त फायदा झाला. कारण सिने इंडस्ट्रीच्या शहरात तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे सपोर्ट सिस्टिम असले तर दीर्घ प्रवासासाठी बराच फायदा होतो.'

  • मात्र माझे आई-वडील या क्षेत्रात आल्यामुळे खुश नव्हते

मी कोणत्याही फिल्मी कुटुंबाची नव्हते, माझा खरोखरच इंडस्ट्रीतील कोणाशीही संपर्क नव्हता, म्हणूनच चित्रपटात येण्यापूर्वी मोठा गोंधळ उडाला होता. सर्वात आधी मला पालकांना या क्षेत्रात जायचे असे सांगण्यासाठी हिम्मत करावी लागली. त्यांना विनंती करावी लागली. शेवटी मी पालकांना बोलण्याचे धाडस केले. माझ्या निर्णयावर ते फारसे खुश नव्हते आणि माझ्या काळजीपोटी ते तसे म्हणत असतील, तेही खरेच होते. त्यानंतर मी फिल्म स्कूलमध्ये जाण्याचे ठरवले, मात्र त्यांची फी खूप जास्त होती. त्यामुळे मला कर्ज घ्यावे लागले.’

  • शिस्त नसल्याने शाळेत नापास झाले

मी फिल्म शाळेत प्रवेश घेतला आणि मी नापास झाले. मी वाईट अभिनेत्री म्हणून नव्हे तर शिस्त नसल्यामुळे मी नापास झाले होते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. आता आपलं काही खरं नाही, असे त्यावेळी मला वाटले हाेते. खूप वाईट वाटले होते. त्याशिवाय माझ्या डोक्यावर 13 लाखांचे कर्ज होते. ती खूप मोठी रक्कम होती. माझे अस्तित्व आणि अभिनयाची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी मी नोकरीच्या शोधात लागले. पुन्हा एकदा पालक माझ्या नोकरीच्या पूर्णपणे विरोधात होते आणि मी परत अभ्यास करावा, अशी त्यांची इच्छा होती, मात्र त्यांना सांगितले की, मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवून घेईल.

  • जो दरवाजा उघडेल त्यात प्रवेश करणार, असे मी ठरवले होते

त्यानंतर मी यशराज फिल्म्समध्ये शानु शर्मासोबत असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून नोकरी करणे सुरू केले. तेथे मी सर्व बारीकसारीक गोष्टींवर लक्ष देत हाेते. मीदेखील अभिनय करू शकते, मीदेखील हिराेइन होऊ शकते, असा विश्वास मला त्यावेळी झाला होता. मी तेथे एका विद्यार्थ्यासारख्या सर्व गोष्टी शिकत होते. काम करत असताना या जगात मी जाऊन दाखवेन अशी मनाशी गाठ बांधली होती. जो दरवाजा उघडेल त्यात जायचे ठरवले होते. खरं तर, माझे जीवन खूपच संघर्षात गेले आहे आणखी किती संघर्ष करावा लागेल, असा विचार करत होते. त्यानंतर ‘दम लगा के हईशा’ मिळाला मात्र त्यानंतरही मला बरीच वाट पाहावी लागली आणि आता ती वाट पाहणे यशस्वी ठरली आहे.