आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bhoomi Pednekar Starts New Initiative For Environmental Protection, Said 'I Try To Change The Thinking Of Those Who Misuse Natural Resources'

एक्सक्लूझिव्ह:पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भूमी पेडणेकरने सुरु केली नवी मोहिम, म्हणाली - ‘देशाचे हवामान सकारात्मक, निसर्ग हिरवागार करण्यासाठी धोरण तयार करा...'

अमित कर्ण. मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची लोकसंख्या इतकी मोठी आहे की, जागितक मीडिया त्याबद्दल बोलला काय आणि नाही बोलला काय काहीच फरक पडत नाही, असे भूमी म्हणाली.

अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेक वर्षांपासून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. लॉकडाऊनदरम्यान तिने OneWishForEarth ही मोहिम सुरु केली असून यात अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, करण जोहर हे सेलिब्रिटी जुळले आहेत.  

  • तू पर्यावरणासाठी जी मोहीम सुरू केली आहे, त्यात किती सेलेब्सचा सहभाग आहे?

स्पष्टपणे तर सांगू शकत नाही, परंतु ज्यांना मी वैयक्तिकीरीत्या ओळखते त्या सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करते. पुढच्या काही वर्षांत आपण सर्वांनी निसर्गाला मजबूत करायचे आणि जनावरांप्रती जी क्रूरता आहे त्याला कमी करायचे आहे या गोष्टींवर सर्वांनी जोर दिला आहे. आपण जर असे केले तर निसर्ग पुन्हा हिरवागार होईल असे सर्वांना वाटते.

  • परंतु, यश कसे येणार? आजही मोठ्या शहरांमध्ये ऑफिस आणि घर खूप लांब आहे. रस्त्यावर गाड्या वाढल्यामुळे प्रदूषण होणार नाही का?

नागरिकांनी वैयक्तिकरीत्या पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे, हेच मी केलेल्या उपक्रमाचे उिद्दष्ट आहे. सरकारवर टीका करणे सोपे आहे, परंतु आपण वैयक्तिकरीत्या काय करत आहोत? अद्यापही प्लॅस्टिक वापरत आहोत. अद्यापही आपण खूप जेवण, वीज वाया घालवत आहोत. पर्यावरणासंबंधी आपण सामान्य संभाषणात बोलतही नाही. माझ्या उपक्रमाचे उद्दिष्ट हेच आहे की पर्यावरण हा सर्वसामान्यांचा प्रश्न असावा.

  • जर मनुष्याने आता स्वत:ला सांभाळले नाहीतर काय होईल, तुला काय वाटते?

सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल. येथे दररोज 150 वेगवेगळ्या जाती विलुप्त होत आहेत ही वास्तविकता आहे. आस्ट्रेलियाच्या जंगलात तर कोटींच्या संख्येने जनावरे पेटली. अशी आग माहीत नाही किती ठिकाणी लागली आहे. प्रत्येक श्रीमंताच्या घरात एअर प्युरिफायर लावलेले आहे. शहरात पाण्याची कमतरता असेल तर गावातून आणले जाते. अशावेळी गावातील शेतकरी काय करतील. जनावरांची तस्करी थांबवावी लागेल. जे सामान बनवण्यासाठी एखाद्या जनावराचा जीव गेला असेल ते सामान आपण ग्राहक म्हणून खरेदी करू नये. तेव्हाच जनावरांची तस्करी कमी होईल. निसर्गाचे संतुलन राहील.

  • ग्लोबल मीडिया ग्रेटा थनबर्ग (स्वीडिश सोशल अॅक्टिव्हिस्ट)च्या कामाला मोठे करून सादर केले जाते. भारत करत असलेल्या कामासंबंधी जगासमोर काय सांगितले जाते?

भारताची लोकसंख्या इतकी मोठी आहे की, जागितक मीडिया त्याबद्दल बोलला काय आणि नाही बोलला काय काहीच फरक पडत नाही. याचा आपली मीडिया किती प्रचार आणि प्रसार करते यामुळे फरक पडतो आणि लोकांच्या मनात प्रश्न निर्माण हाेतात. भारत सकारात्मक हवामानाचा देश आहे. हा असा देश आहे जेथे खूप साऱ्या समस्यांचे समाधान पर्यावरण संरक्षणात दडलेले आहे. यासाठी असे धोरण आणि पायाभूत सुविधा तयार करा ज्यामुळे निसर्ग हिरवागार होईल. शहरांमध्ये नैसर्गिक स्रोत वापरणारे लोक आहेत, त्यांचा विचार बदलण्याचा माझा प्रयत्न आहे. ते बेफिकीर लोक आहेत. कारण त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीच गैरसोय झाली नाही. त्यांना दूर जाऊन पाणी आणावे लागले नाही. कधी तासन‌तास विजेसाठी तरसावे लागले नाही, म्हणून ते याला महत्त्व देत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...