आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:पहिल्यांदा एका सामान्य मुलीची भूमिका आणि आता लार्जर दॅन लाइफ 'दुर्गामती', दोन्ही कसे जमले सांगतेय भूमी पेडणेकर

अमित कर्ण, मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच बघितला होता, साइन करण्याच्या नंतर नाही.

भूमी पेडणेकर अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे एकाच वर्षात दोन चित्रपट विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. तिचा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर आला. आता ‘दुर्गामती’ अॅमेझॉनवर येत आहे. हे ‘भागमती’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी अॅडेप्टेशन आहे, ज्यात ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीची मुख्य भूमिका साकारली होती. भूमीने या चित्रपटाच्या संदर्भात ‘भास्कर’शी विशेष गप्पा मारल्या....

 • पहिल्यांदा एका सामान्य मुलीची भूमिका आणि आता लार्जर दॅन लाइफ दुर्गामती. दोन्ही कसे जमवले?

तुमच्याकडे कॅनव्हास असतो तेव्हाच एखादा अभिनेता इतका वैविध्यपूर्ण परफॉर्मन्स देऊ शकतो. सुदैवाने माझ्याकडे अशा प्रकारच्या ऑफर येत असतात.

 • या चित्रपटाचे काम सुरू करण्याआधी मूळ ‘भागमती’ चित्रपट बघितला होता ?

मी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच बघितला होता, साइन करण्याच्या नंतर नाही. अनुष्का शेट्टीने खूप चांगले काम केले आहे. तोच तोचपणा घेऊन काम करण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे दुर्गामती साइन केल्यानंतर मी तो बघितला नाही. मला काहीतरी वेगळे करायचे होते.

 • मध्य प्रदेशातल्या कोणत्या खास ठिकाणी याचे चित्रीकरण केले?

भोपाळजवळ याचे चित्रीकरण केले होते. येथील राणी महल नावाच्या हवेलीमध्ये चित्रीकरण करण्यात आले. हवेली खूप जुनी होती. रिअल लोकेशनला चित्रीकरण करण्याचा फायदा म्हणजे तुमच्यात खूप ऊर्जा राहते आणि त्या जागी तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळाल्यासारखे वाटते.

 • ज्यांनी ‘भागमती’ बनवला होता, ते अशोकच या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत? त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा वाटला ?

ते कलाकारांना सोबत घेऊन काम करतात. त्यांनी अगोदरच 'भागमती' सारख्या हिट चित्रपटाची निर्मिती केली म्हणून कलाकारांनी सुचविलेल्या नव्या कल्पना ऐकायच्या नाहीत असे त्यांचे नाही. मी कोणत्याही प्रकारे या दृश्य चित्रपटाचा भाग नाही. मोठ्या पडद्यावरही मी अशा प्रकारचा पेहराव व शक्तीने काम केले नाही.पण तरीही अशोक सरांनी माझ्या संकल्पनाही स्वीकारल्या. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेता येणे शक्य झाले.

 • हा एक भव्य असा व्हीएफएक्स चित्रपट आहे, यासाठी कॅमेऱ्यासमोर काहीतरी विशिष्ट करावे लागले का ?

ते गुपितच राहू द्या. ती गोष्ट सांगितली तर पडद्यावर मी साकारलेल्या भूमिकेची रंजकता निघून जाईल. पण खरंच हा माझा पहिलावहिला भव्य असा व्हीएफएक्स चित्रपट आहे. त्यामुळे सेटवर वातावरणही वेगळे होते. समोर आणि आजूबाजूला खूप गोष्टी नव्हत्या. पण मनात त्या गोष्टींची प्रतिमा आणून तसेच त्याची अनुभूती घेऊन मी चित्रीकरण केले. हे सर्व करणे म्हणजे तलवारीच्या धारदार पात्यावरून चालण्यासारखे होते.

 • चित्रपटाचे नाव का बदलले ?

हा निर्मात्यांचा निर्णय होता. ‘दुर्गावती’पेक्षा ‘दुर्गामती’ नाव जास्त संयुक्तिक असल्याचे त्यांना जाणवले. चित्रपट बघितल्यावर रसिकांना देखील याची अनुभूती होईल.

 • हॉरर चित्रपट बघायला आवडतो?

मला खूप भीती वाटते म्हणून मी जास्त हॉरर चित्रपट बघत नाही. दुर्गामती पूर्णपणे हॉरर चित्रपट नाही. हा एक कॉन्स्परन्सी थ्रिलर आहे. हो, पण यात भय जरूर आहे.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser