आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकिंग डिटेल्स- 'भूज : द प्राइड ऑफ इंडिया':अजय देवगणच्या 'भूज'च्या प्रत्येक अ‍ॅक्शन दृश्यावर खर्च झाले 50 लाख रुपये, 120 काेटींच्या बजेटमध्ये बनला चित्रपट

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 कोटी खर्च झाले फायटर प्लेन बनवण्यात, भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिले टँक
  • 60 हजार लिटर पाण्याचा वापर करत रामोजी राव स्टुडिओमध्ये शूट झाले पूल तोडण्याचे दृश्य

या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणाऱ्या अजय देवगणच्या ‘भूज..’ चित्रपटाच्या दृश्यावर बेहिसाब पैसे खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या सूत्रांनी सांगितले, चित्रपटात लष्कर आणि वायुदलाचे अनेक अ‍ॅक्शन दृश्य आहेत. त्यांना जीवंत आणि प्रभावी दाखवण्यासाठी त्यावर अवाढव्य पैसा करण्यात आला आहे. खरं तर, 1971च्या काळात लष्कराकडे कमी शस्त्र असायचे. कमी शस्त्राशिवाय आणि मेंदुचा वापर करण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. ते दाखवण्यासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करण्यात आला.

दोनदा शूट केले एकच दृश्य

चित्रपटात पुल तोडण्याचे एक दृश्य आहे. ते आधी भूजमध्ये शूट केले गेले होते, मात्र संपादन टेबलावर निर्मात्यांना तो इतका प्रभावी दिसला नाही. व्हीएफएक्सच्या टीमनुसार त्या दृश्यात रोमांच उत्साहाची भावना दिसून येत नव्हती. त्यामुळे ते दृश्य पुन्हा रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट केले गेले. भारतीय लष्कर तो पुल दारूगोळ्याने नव्हे तर पाण्याच्या ताकदीचा वापर करुन उडवते. पाण्याचे प्रेशर दाखवण्यासाठी रामोजी फिल्मसिटीमध्ये 60 हजार लीटर पाणी एकत्र करुन त्याच्या लाटेतून पूल उडण्याचे दृश्य चित्रीत केले गेले.

100 किलो मिरचीच्या गंजावर केली फाइट
चित्रपटातील एक दृश्य मिरचीच्या गंजावर केले गेले आहे. अजय देवगणच्या पात्राला जेव्हा कळते की, पाकिस्तानातून मिरचीच्या पोत्यातून शस्त्राची तस्करी केली जात आहे, तेव्हा तो तेथे जातो. हे दृश्य मुंबईत चित्रीत करण्यात आले, त्यासाठी एका गोदामात हे दृश्य केले गेले. 100 किलो मिरची फरशीवर टाकण्यात आली. अजय त्या वाळलेल्या मिरचीच्या गंजावर तस्करांसोबत हाणामारी करतो. त्या पूर्ण दृश्यात मिरची पावडर उडते. डोळ्यात आग झाल्यानंतरही अजयने ते दृश्य शूट केले आहे.

महत्त्वाच्या भूमिकेत नोरा फतेही
चित्रपटात नोरा फतेहीचे फक्त एक डान्स नंबरच नव्हे तर तिची एक महत्त्वाची भूमिकादेखील आहे. ती भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करत पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवते. पहिल्या भागात तिचे काम महत्त्वाचे आहे. सोनाक्षी सिन्हा दुसऱ्या भागात दिसते. ती अजयच्या पात्राला रनवे बनवण्यात मदत करते. शरद केळकर लष्कराच्या नायकाच्या भूमिकेत आहेत. संजय दत्तचीदेखील भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्या पात्राला पाकिस्तानी सैन्याची प्रत्येक गोष्ट माहित असते.

युद्धाच्या दृश्यासाठी निर्मात्यांनी रोज 50 लाख रुपये खर्च केले

चित्रपटात पाकिस्तानी सैनिकांचे हल्ल्याचे दृश्य 300 ज्युनिअर आर्टिस्ट्ससोबत शूट केले गेले. व्हीएफएक्सच्या मदतीने 300 सैनिकांना 1800 सैनिकांच्या फौज असल्याचे दाखवण्यात आले. शिवाय भारतीय लष्करानेदेखील निर्मात्यांना मदत केली. लष्कराने निर्मात्यांना मूळ टँक आणि इतर साहित्य पुरवले. शूटिंगमध्ये वापरण्यासाठी फायटर प्लेनचे एक्सटीरिअर दिले गेले. त्याच्या मदतीने आर्ट डायरेक्टर्सच्या टीमने स्वत:च फायटर प्लेन तयार केले. ते बनवण्यासाठी दीड ते दोन कोटी रुपये खर्च झाले. अशा प्रकारचे बरेच सीन चित्रपटात आहेत निर्मात्यांनी यासाठी रोज 50 लाख रुपये खर्च केले आहेत. एकूण 100 पेक्षा जास्त दिवस शूटिंगसाठी लागले.

बातम्या आणखी आहेत...