आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात बालिवूड:अक्षय कुमार-गोविंदा पाठोपाठ आता भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांना कोरोनाची लागण, दोघेही सध्या होम क्वारंटाइन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूमी म्हणाली - मी ठिक आहे
  • विकी म्हणाला - मी सध्या होम क्वारंटाइन

बॉलिवूडमध्येही कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोविंदा यांच्यानंतर आता अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. दोन्ही कलाकार सध्या होम क्वारटंाइनमध्ये आहेत.

भूमी म्हणाली - मी ठिक आहे
भूमीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तिने लिहिले, 'माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या.' असे भूमीने सांगितले आहे.

पुढे ती म्हणाली आहे, 'वाफ घेणे, विटामिन सी, खाणे आणि आनंदी मूड असे सर्व सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. सर्व काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. मास्क घाला. सॅनिटाइझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा आणि सामाजिक भान राखा आणि काळजी घ्या,' अशी पोस्ट भूमीने लिहिली आहे.

विकी म्हणाला - मी सध्या होम क्वारंटाइन
दुसरीकडे विकी कौशल यानेदेखील सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. 'संपूर्ण काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,' अशा आशयाची पोस्ट विकीने केली आहे.

यापूर्वी अनेक सेलिब्रिटी अडकले कोरोनाच्या विळख्यात
रविवारी अक्षय कुमार आणि गोविंद यांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर यापूर्वी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.

बातम्या आणखी आहेत...