आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

  लॉकडाऊन लर्निंग:आईसोबत हायड्रोपोनिक्स शेती शिकत आहे भूमी पेडणेकर, म्हणाली- मी निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई सुमित्रासोबत भूमी आणि तिने शेअर केलेली चवळीच्या हिरव्या भाजीचे छायाचित्र. हे छायाचित्र भूमीने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये लावले होते. - Divya Marathi
आई सुमित्रासोबत भूमी आणि तिने शेअर केलेली चवळीच्या हिरव्या भाजीचे छायाचित्र. हे छायाचित्र भूमीने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये लावले होते.
  • भूमी म्हणते की, लॉकडाऊन दरम्यान मी निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये चित्रपटसृष्टीतील बहुतेक सेलिब्रिटी त्यांच्या नेहमीच्या आयुष्याशी संबंधित व्हिडिओ शेअर करत आहेत, तर अभिनेत्री भूमी पेडणेकर याकाळात काही वेगळे करत आहेत. हा मोकळा वेळ भूमी आई सुमित्रा पेडणेकर यांच्याकडे हायड्रोपोनिक्स शेती कशी करावी हे शिकण्यासाठी वापरत आहे. तिच्या आईने घरात एक बाग लावली आहे, जिथे त्या भाजीपाला पिकवतात. भूमी म्हणते की, लॉकडाऊन दरम्यान मी निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी खुलासा करताना भूमी म्हणाली, 'आमचे स्वतःचे हायड्रोपोनिक्स गार्डन असावे जिथे आपण स्वतः भाजीपाला पिकवू शकू अशी माझी आणि माझ्या आईची इच्छा होती. आम्हाला घरी नैसर्गिक जीवनशैलीसाठी एक बाग पाहिजे होती आणि आम्ही दोघीही प्रगती होत असल्याने आनंदी आहोत.'

  • निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला

भूमी पुढे म्हणाली, 'या क्वारंटाईनच्या काळात मला हायड्रोपोनिक्सचे विज्ञान शिकण्यासाठी वेळ मिळाला आहे आणि पर्यावरण संरक्षणाचा अर्थ काय आहे हे मला समजले आहे. यावेळी मी माझ्या आईबरोबर मिळून काम करत आहे. मला अभिमान आहे की, आमची बाग आता आठवड्यातून दोन दिवस आमच्यासाठी खाद्य उत्पादन करू शकते. लॉकडाऊन दरम्यान मी निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मला समजले आहे की एक समुदाय म्हणून आपण पूर्णपणे स्वावलंबी बनू शकतो आणि ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो.'

  • हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय?

मातीविरहित फलोत्पादनाच्या विज्ञानास हायड्रोपोनिक्स म्हणतात. मुळात पारंपारिक मातीचा वापर न करता खनिज समृद्ध पाण्याचा वापर करुन निरोगी वनस्पती वाढवण्याची ही एक पद्धत आहे. रोपाला वाढण्यासाठी फक्त निवडक पोषकद्रव्ये, थोडेसे पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या प्रकारच्या शेतीमुळे रसायनांचा वापर कमी होतो आणि माती प्रदूषण कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तसेच जिथे मातीची कमतरता आहे तेथेही लागवड करता येते.

हायड्रोपोनिक्स शेतीचे प्रतीकात्मक छायाचित्र.
हायड्रोपोनिक्स शेतीचे प्रतीकात्मक छायाचित्र.
बातम्या आणखी आहेत...