आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bhumi Pednekar Said 'Raksha Bandhan' Gives Me The Chance To Reunion With Akshay Kumar And Anand L Rai, The Most Special People Of My Life

'रक्षाबंधन':भूमी पेडणेकर म्हणाली -'रक्षाबंधन'च्या निमित्ताने मला माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तींसोबत रियुनियची संधी मिळाली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला

अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपला आगामी चित्रपट रक्षाबंधनच्या मुंबई शेड्यूलचे शूट पूर्ण केले आहे. यात ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. याबरोबरच ती निर्माता-दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासोबत पुन्हा काम करणार आहे. आनंद यांनी याआधी तिच्या शुभमंगल सावधानची निर्मिती केली आहे.

आनंद एल राय यांना गुरु मानते भूमी
याविषयी भूमी सांगते, 'रक्षाबंधन चित्रपटातून मला पुन्हा एकदा माझ्या आयुष्यातील दोन खास व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. कारण आनंद सरांना मी गुरु मानते. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली. शुभमंगल सावधनामधून त्यांनी मला जी संधी दिली त्यासाठी मी त्यांची कायम आभारी राहिल. मला आनंद आहे की, पुन्हा एकदा मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.'

अक्षयने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
अक्षय कुमारविषयी भूमी सांगते, 'अक्षय नेहमी प्रोत्साहन देतो. त्याच्यासोबत मी टॉयलेट : एक प्रेमकथा सारखा हिट चित्रपट केला आहे. तो माझा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. आपण प्रेक्षकांची मनं जिंकू हा आत्मविश्वास त्यांनी माझ्यात निर्माण केला. त्यामुळे रक्षाबंधन या चित्रपटात अक्षयसोबत काम करण्याची संधी मिळतेय, हे जेव्हा मला समजले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.'

बातम्या आणखी आहेत...