आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बर्थ डे गर्ल:वाढदिवसाचा प्लॅन अगदी सिंपल अन् बेसिक, कोविडची लसच ठरेल सर्वोत्कृष्ट भेट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदाचा वाढदिवस आई आणि बहिणीसोबत साजरा करणारा, त्यामुळे तो स्पेशल असेल

भूमी पेडणेकर एक नव्या उमेदीची अभिनेत्री असून, तिची नेहमीच प्रशंसा होत असते. अभिनय करण्यापूर्वी तिने यशराज बॅनरमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. भूमीला पहिल्या ‘दम लगा के हाईशा’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे ‘फिल्मफेअर’ मिळाले होते. आज वाढदिवसानिमित्त ती काय विशेष करते आहे. हे जाणून घेऊया...,

या वेळी माझा वाढदिवस वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्पेशल आहे. विशेष कारण म्हणजे या वेळी मी कुणालाच भेटू शकणार नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत घरीच राहणार आहे. बर्थडे सेलिब्रेशन एकदम सिंपल आणि बेसिक असेल. माझी एवढीच इच्छा आहे की, या महामारीमुळे संक्रमित झालेल्या लोकांचे आयुष्य चांगले व्हावे, लस लवकर यावी हीच या बर्थडेची सर्वोत्कृष्ट भेट असेल. दरवर्षी माझा बर्थडे खूप उत्साहात साजरा केला जातो. माझ्या जवळच्या लोकांना मी कोणत्याही परिस्थितीत बोलावते. सगळे लाड करतात. बघून खूप छान वाटते. पण या वेळी मी फक्त माझ्या आई आणि बहिणीसोबतच घरी राहणार आहे. अर्थातच मी माझ्या चाहत्यांचे आशीर्वाद व्हिडिओ कॉल करून घेईन. 

शूटिंग, सेट्सशिवाय आयुष्य....
माझे आयुष्य खूप व्यग्र आहे. पण कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला आवडते. सध्या शूटिंग आणि सेट्सला खूप मिस करतेय. कामही मिस करते. सगळे पहिल्यासारखे लवकरच सुरळीत होईल असे वाटते. लोक व्हायरससोबत जगायला शिकत आहेत. इतर क्रिएटिव्ह लोकांप्रमाणे मीही माझा वेळ काही रचनात्मक गोष्टी करण्यात घालवला. काही वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली. कुकिंग आणि घरकामात मदत केली. ध्यानधारणा केली. याव्यतिरिक्त खूप लिहिले आणि वाचनही केले. शिवाय मी या महिन्यात अनेक डिजिटल करारही केलेत. त्यामुळे या सर्व कामांमध्ये मी खूप बिझी होते.

कुटुंबासोबत वेळ घालवला....
मागच्या चार महिन्यांपासून मी कुटुंबासोबत बराच वेळ घालावला. त्यामुळे काही नवीन पैलू जाणून घेता आले. जेवणापासून वाचनही आम्ही सगळे एकत्र करत होतो. माझी बहीण माझ्यापेक्षा जास्त काम करते याची मला जाणीव झाली. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून तिने कधीच कामातून ब्रेक घेतला नाही. फक्त नाष्टा आणि चहा पितानाच आम्हाला सोबत बसायला वेळ मिळत होता.

ऑनलाइन स्क्रिप्ट ऐकवली...
लॉकडाऊनच्या काळात मी झूमच्या माध्यमातून स्क्रिप्ट ऐकवली. हा खूप चांगला अनुभव होता. या माध्यमातून स्क्रिप्ट ऐकवणे तितकेच प्रभावी आहे. मला ही ऑनलाइन स्क्रिप्ट ऐकवण्याची पद्धत जास्त आवडली. यामुळे अनेक लेखकही त्यांच्या कामात व्यग्र असतील. खरे तर पूर्वीचे दिवस लवकर परत येतील हीच प्रार्थना करते. आम्हाला तर या वातावरणातही काम करणे गरजेचे आहे. मला सेटवर जाऊन लवकर कामाची सुरुवात करायची आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा विचार करून मला वाईट वाटते. काम बंद असल्यामुळे त्यांचे जास्त हाल झालेत. मी वर्कहॉलिक आहे.