आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरल्या फक्त आठवणी:सुशांतला विसरु शकत नाही त्याची ऑनस्क्रीन बहीण, भावनिक पोस्टमध्ये लिहिले - 'तुझ्या जाण्याचे रहस्यदेखील तुझ्यासोबत गेले' 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात भूमिका चावलाने धोनीच्या भूमिकेत असलेल्या सुशांतची मोठी बहीण जयंतीची भूमिका साकारली होती.

सुशांत सिंह राजपूतला या जगाचा निरोप घेऊन एका आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. कुणीही त्याला विसरु शकत नाहीये. चित्रपटात त्याच्या बहिणीची भूमिका वठवणारी अभिनेत्री भूमिका चावलादेखील त्याला विसरु शकत नाहीये. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत तीनदा सुशांतची आठवण काढली आहे.  नुकत्याच लिहिलेल्या पोस्टमध्ये भूमिकाने लोकांना सुशांतच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्क लावण्याऐवजी वेळेचा योग्य वापर करण्यास सांगितले आहे.

सोमवारी लिहिलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये भूमिकाने लिहिले, 'प्रिय सुशांत, तू जिथे कुठे असशील.. तिथे देवाजवळ आहेस... तुला जाऊन एका आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे... तू कशामुळे दूर गेला... हे रहस्य देखील तुझ्यासोबत गेले... तुझ्या अंत:करणात आणि मनात ते दफन झाले', असे भूमिका म्हणाली. 

  • खूप गाळ पसरला आहे

भूमिकाने पुढे लिहिले की, 'ज्या लोकांवर याचा परिणाम झाला आहे, अशा सर्वांना मला सांगायचे आहे की, तुम्ही प्रार्थना करा आणि या वेळेचा उपयोग स्वतःची आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घेण्यासाठी करा. हे का घडले याबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत… त्याबद्दल बराच गाळ पसरला आहे… याबद्दलही खूप संतापदेखील आहे', असेही ती म्हणाली.

  • मृत्यूच्या दुसर्‍याच दिवशी भावनिक पोस्ट लिहिली होती

सुशांतच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी, भूमिकाने लिहिले होते, "आशा आहे की, तू आपले अंतिम ध्येय गाठले असेल... आणि तू आपल्या आईलाही भेटला असशील. हे अतिशय हृदयद्रावक आहे… काश तू तुझ्या मित्रांशी आणि कुटुंबीयांशी बोलला असता.. काश त्यांना तुझी शांतता समजली असती… देव तुझ्या कुटुंबियांना शक्ती देवो...', अशी भावनिक पोस्ट भूमिकाने लिहिली होती.  

  • शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो केला होता शेअर 

एक दिवसानंतर, भूमिकाने सुशांतसोबतच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा एक फोटो शेअर केला होता, त्यासोबत लिहिले होते, "मुंबईत एमएस धोनीसाठी शूटिंग करण्याचा हा आमचा शेवटचा दिवस होता... मग आम्ही हा फोटो एकत्र घेतला. ही जानेवारी 2016 ची गोष्ट आहे.. आणि हा शेवट होता... आणि हा देखील शेवट आहे...' 

बातम्या आणखी आहेत...