आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका चावलाचा वाढदिवस:भूमिकाने 'तेरे नाम'मध्ये सलमान खानसोबत केले होते काम, यश मिळाले नाही म्हणून सपोर्टिंग रोलमधून केले होते कमबॅक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 वर्षांनंतर सहाय्यक भूमिकेद्वारे स्क्रिनवर परतली

अभिनेता सलमान खानसोबत 'तेरे नाम' (2003) चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिका चावला आता 43 वर्षांची झाली आहे. तेरे नाम या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर भूमिकाने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला, पण ती स्वतःची वेगळी छाप पाडण्यात यशस्वी झाली नाही. आता ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीऐवजी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसते. 2007 च्या 'गांधी माय फादर' चित्रपटानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नव्हती.

9 वर्षांनंतर सहाय्यक भूमिकेद्वारे स्क्रिनवर परतली
2007 नंतर भूमिका अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. त्यानंतर 2016 मध्ये ती 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाद्वारे 9 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतली होती. पण या चित्रपटात ती फक्त सहाय्यक भूमिकेत होती. केवळ बॉलिवूडच नाही तर साउथच्या चित्रपटांमध्ये देखील तिला मुख्य भूमिकांऐवजी सहाय्यक भूमिकांची ऑफर दिली जात आहे. भूमिकाने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात आणि म्युझिक अल्बमद्वारे केली होती. त्यानंतर तिला साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आली.

दिल्लीत झाली लहानाची मोठी

भूमिकाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी नवी दिल्लीच्या पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील ए. एस चावला आर्मी ऑफिसर आणि आई बाली चावला शिक्षिका होत्या. भूमिकाचे बालपणीचे नाव रचना आहे. तिला प्रेमाने गुडिया म्हणतात. खरं तर आडनाव सारखे असल्याने तिला जुही चावलाची बहीण समजले जाते. पण दोघींमध्ये कोणतेही नाते नाहीये.

दिल्लीमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1997मध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला गेली. हळू-हळू तिला जाहिराती आणि अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळू लागली. फेअर अँड लव्हली, डाबर लाल तेलसारख्या प्रॉडक्टच्या जाहिराती केल्यानंतर तिला अदनाम सामी आणि उदित नारायणसारख्या गायकांच्या अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. जाहिरातीमधून मिळालेल्या लोकप्रियतेने तिला तेलुगू सिनेमांमध्ये काम मिळू लागले.

साऊथ चित्रपटांद्वारे केला होता डेब्यू
2000 मध्ये 'युवाकुडु' या तेलुगु चित्रपटामध्ये काम केले होते. 'खुशी' (2001) दुस-या तेलुगु चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याशिवाय तिने 'रोजा कुटम' (2002), 'मिस्सममा' (1995), 'आदन्थे अडो टाइप' (2003), 'जय चिरंजीवा' (2005), 'स्वागतम' (2008), 'भ्रमरम' (2009), 'ना स्टाइले वेरु' (2009) सह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले.

योगागुरुसह केले लग्न
भूमिकाने 2007 मध्ये योगगुरु भरत ठाकूरसोबत लग्न केले. लग्नापुर्वी चार वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. भूमिका भरत ठाकूर यांच्याकडून योग शिकायची. दोघांनी नाशिकच्या एका गुरुद्वारात लग्न केले होते. 2014 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.

'तेरे नाम'मधील अभिनय पसंत पडला होता
दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये 9 चित्रपट केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 2003 मध्ये तिने 'तेरे नाम' या सुपरहिट चित्रपटात तिने सलमान खानसह काम केले. यात तिने मेघनाचे पात्र साकारले होते. सलमानसह तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली. या चित्रपटाला आठ अवॉर्ड मिळाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर तिला 'रन' (2004), 'दिल ने जिसे अपना कहा' (2004), 'सिलसिले' (2005), 'दिल जो भी कहे' (2005), 'फॅमिली' (2006) 'गांधी माय फादर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही.

बातम्या आणखी आहेत...