आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्फर्म:'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'दे दे प्यार दे' चित्रपटांचा सिक्वेल लवकरच येणार, निर्माता भूषण कुमार यांनी दिला दुजोरा 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूषण कुमार म्हणाले- “आम्ही नक्कीच 'सोनू की टीटू की स्वीटी 2' बनवणार आहोत. पुढे जाण्यासाठी ही एक उत्तम फ्रेंचाइजी आहे.'

 2018 मध्ये आलेला लव रंजन दिग्दर्शित  'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 2019 च्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटांनी आपल्या  उत्कृष्ट कॉन्सेप्टने सर्वांचे मन जिंकले होते. आता या चित्रपटांच्या सिक्वेलच्या बातमीला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही दुजोरा दिला आहे.

कार्तिक आर्यन, सनी सिंग आणि नुसरत भरूचा हे तिघे 2018 मध्ये आलेल्या 'सोनू की टीटू की स्वीटी' या हिट चित्रपटात झळकले होते. चित्रपटाचे संवाद आणि विनोदाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. चाहते बर्‍याच दिवसांपासून त्याच्या सिक्वेलची वाट बघत  होते. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत निर्माता भूषण कुमार यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले- “आम्ही नक्कीच 'सोनू की टीटू की स्वीटी 2' बनवणार आहोत. पुढे जाण्यासाठी ही एक उत्तम  फ्रेंचाइजी आहे.'

या मुलाखतीदरम्यान भूषण कुमार यांनी 'दे दे प्यार दे'च्या सिक्वेलवर बोलताना सांगितले की, त्यांनी लव रंजन यांच्यासोबत मिळून याच्याही सिक्वेलचा विचार केला आहे. दुस-या भागात 25 वर्षीय रकुल प्रीत तिच्या वयाच्या दुप्पट असलेल्या अजय आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरच्यांशी भेटायला घेऊन जाईल, असा अंदाज वर्तवला जातोय. पहिला चित्रपटही याच हिंटवर संपला होता.

दाक्षिणात्य चित्रपटांचेही बनवणार रिमेक : लॉकडाऊन दरम्यान निर्माते भूषण कुमार यांनी दक्षिण चित्रपटांचे रीमेक बनवण्याचा विचार केला आहे.  ते म्हणाले, आम्ही काही चित्रपट शॉर्टलिस्ट केले आहेत. आम्ही सर्व काही सामान्य झाल्यावर या चित्रपटांचे हक्क खरेदी करू.

लॉकडाऊनपासून शुटींग थांबले: लॉकडाऊनमुळे भूषण कुमार यांच्या 'भुज: द प्रेड ऑफ नेशन' चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. दुसरीकडे, टी-सीरिजचा चित्रपट 'सत्यमेव जयते 2'चे प्रदर्शनदेखील पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. ते म्हणतात की, लॉकडाऊन उघडल्यानंतरही लोक थिएटरमध्ये येतील की नाही, यावर काही बोलता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...