आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कास्टिंग काउच:टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल, चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचा आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आरोपांवर अद्याप T-Series कडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही

T-Series चे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर मुंबईतील डीएन नगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्यावर एका 30 वर्षीय महिलेले आपल्या चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, आतापर्यंत टी-सीरिजकडून या आरोपांबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आले नाही.

काम देण्याचे आमिष दाखवून भूषण कुमार यांनी 2017 ते ऑगस्ट 2020 (3 वर्षे) पर्यंत तिच्यावर अत्याचार केल्याचा या महिलेचा आरोप आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली
पीडित महिलेचा आरोप आहे की, भूषण कुमार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. भूषण कुमार यांनी तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. भूषण केवळ टी-सीरिजचे मॅनेजिंग डायरेक्टरच नाही तर अनेक बड्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारीही ते सांभाळत आहे.

अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे
2001 साली भूषण कुमार यांनी 'तुम बिन' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. भूल भुलैया, आशिकी 2, सनम रे, ऑल इज वेल, सरबजीत, बादशाहो, तुम्हारी सुलु, भारत आणि सत्यमेव जयते अशा अनेक चित्रपटांची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...