आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Big Announcement: Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' To Release In January 2022, Ajay Devgan's 'Maidan' And Adhyayan Suman's 'Bekhudi' Release Date Also Announced

बिग अनाउंसमेंट:आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' जानेवारी 2022 मध्ये होणार रिलीज, अजय देवगणचा 'मैदान' आणि अध्ययन सुमनच्या 'बेखुदी'चीही रिलीज डेट झाली जाहीर

19 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आतापर्यंत वीसहून अधिक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे ब-याच काळापासून चित्रपटगृह बंद होते, पण आता ही प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र सरकारने येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर अनेक महिन्यांपासून अडकलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही जाहीर केल्या जात आहेत. आता आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी', अजय देवगणचा 'मैदान' आणि अध्ययन सुमनचा 'बेखुदी' या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

 • गंगूबाई काठियावाडी
 • रिलीज डेट - 6 जानेवारी 2022

संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट 2022 या नवीन वर्षात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट कामठीपुराची माफिया क्वीन गंगूबाईच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अजय देवगण या चित्रपटात करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच आलिया भट्टने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना लिहिले, 'माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा एक भाग तुमच्यासाठी घेऊन येत आहे. 'गंगूबाई काठियावाडी' 6 जानेवारी 2022 आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.'

 • मैदान
 • रिलीज डेट- 2 जून 2022

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक राहिलेले सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित 'मैदान' हा चित्रपट पुढील वर्षी 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. गुरुवारी अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अजय व्यतिरिक्त गजराज राव आणि प्रियामणी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमित त्रिवेदी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला, अरुणवा जॉय सेनगुप्ता यांनी संयुक्तपणे केली आहे.

 • बेखुदी
 • रिलीज डेट - 29 ऑक्टोबर 2021

अमित कुसारिया दिग्दर्शित 'बेखुदी' हा चित्रपट यावर्षी 29 ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अध्ययन सुमनने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...