आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Big Announcement On First Death Anniversary: T Series's Bhushan Kumar Is Making A Biopic On Choreographer Saroj Khan's Life, Daughter Sukaina And Son Raju Agreed

स्मृतीदिनी मोठी घोषणा:कोरिओग्राफर सरोज खान यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत टी-सीरिजचे भूषण कुमार, मुलगी सुकैना आणि मुलगा राजूची मिळाली परवानगी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज सरोज खान यांचा पहिला स्मृतीदिन आहे.

बॉलिवूडची अनेक ब्लॉकबस्टर गाणी कोरिओग्राफ करणा-या सरोज खान यांचे 03 जुलै 2020 रोजी निधन झाले होते. दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली. आता त्यांच्या निधनाच्या एक वर्षानंतर निर्माता भूषण कुमार यांनी सरोज खान यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

सरोज खानच्या यांच्या पहिल्या स्मृतीदिनी टी-सीरीजने त्यांच्या बायोपिकची अधिकृतपणे घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सरोज खान यांची मुलगी सुकैना आणि मुलगा राजू खान यांच्याकडूनही चित्रपटासाठी परवानगी घेतली आहे.

आपल्या निवेदनात भूषण कुमार म्हणाले की, सरोज खान यांनी आपल्या नृत्याने कलाकारांची भूमिका केवळ संस्मरणीयच केली नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शनातही क्रांती घडवून आणली आहे.

ते पुढे म्हणाले, सरोज खान यांचा प्रवास वयाच्या तिस-या वर्षापासूनच सुरू झाला, त्यादरम्यान त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. त्यांना आदर आणि सन्मान मिळाला. सुकैना आणि राजू यांनी त्यांच्या आईवर बायोपिक बनवण्यास सहमती दर्शविली याचा मला फार आनंद होत आहे.

सरोज खान यांचा मुलगा राजू खान एका मुलाखतीत म्हणाले, माझ्या आईला नृत्याची खूप आवड होती आणि तिने आपले जीवन नृत्याला कसे समर्पित केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. मी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवले, याचा मला आनंद आहे. माझ्या आईला इंडस्ट्रीकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला. आणि आता तिची कहाणी संपूर्ण जग बघेल ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सन्मानाची बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...