आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्या आठवणी:'गुलाबो-सीताबो'चे किस्से सांगत आहेत बिग बी - वाकून चालल्याने कंबर दुखायची,  प्रोस्थेटिक मेकअपसाठी मध्यरात्री 3.30 वाजता उठावे लागायचे 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गुलाबो-सीताबो' या चित्रपटाचा प्रीमियर येत्या 12 जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शुजित सरकार दिग्दर्शित आगामी 'गुलाबो सीताबो' या चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से आपल्या ब्लॉगवर शेअर केले. उत्तर प्रदेशच्या राजधानीत उन्हाळ्याच्या दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. याकाळात तेथील तापमान 50 अंशांपर्यंत पोहोचते. आम्ही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सकाळी 6.30 वाजता शूटिंग करायचो. पण, यासाठी प्रोस्थेटिक मेकअप करण्यासाठी मला तीन तास अगोदर म्हणजे मध्यरात्री 3.30 वाजताच मेकअप व्हॅनमध्ये हजर व्हावे लागायचे. आणि हे एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते, असे बिग बी म्हणाले आहेत. 

  • घामामुळे ड्रेस बदलावा लागायचा

अमिताभ यांनी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोही आपल्या ब्लॉगवर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले- छायाचित्रात तुम्ही पाहू शकता की, मी घातलेला ड्रेस मागून ओपन होतो. कडक उन्हाळ्यातील शूटिंग पाहता असे करण्याची दिग्दर्शकाची कल्पना होती. उन्हाळ्याच्या काळात लखनौमध्ये पारा 50 अंशांवर पोहोचतो.  घामामुळे मला पुन्हा पुन्हा ड्रेस बदलावा लागेल हे दिग्दर्शकाने जाणले होते.

बिग बीने पुढे लिहितात - अशा परिस्थितीत जर माझ्या ड्रेसला पुढच्या बाजुने बटणं असती तर प्रोस्थेटिक आणि हेअर मेकअपमुळे ड्रेस बदलणे अवघड गेले असते. पण मागच्या बाजुने बटणं असल्यामुळे अशी कोणतीही समस्या आली नाही.

  • उन्हाळ्यात प्रोस्थेटिक मेकअपमध्ये त्रास होतो

बिग बींनी सांगितले, 'दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी शूटिंग सकाळी लवकर सुरू व्हायची. दुपारी ब्रेक घेतला जायचा आणि नंतर संध्याकाळी शूट केले जायचे. हे कॅमेरा लाइटनुसारही सोयीस्कर होते. मात्र सकाळची शूटिंग प्रोस्थेटिक मेकअपसाठी एक भयानक स्वप्न होते. शूटिंगला सकाळी 6.30 वाजता सुरुवात व्हायची आणि मला त्याआधी तीन तास म्हणजे मध्यरात्री 3.30 वाजता मेकअप व्हॅनमध्ये पोहोचावे लागायचे.'

'गरम पाण्यात प्रोस्थेटिक मेकअप टिकत नाही. मेकअप निघून जातो. यासाठी चेहरा थंड ठेवण्यासाठी सेटवर पुरेशी व्यवस्था होती. कुलिंग सिस्टम देखील बसविण्यात आले. पण, सतत शूटिंग दरम्यान, वारंवार गर्मीत जाणे आणि नंतर पुन्हा थंड ठिकाणी येणे माझ्या दृष्टीने योग्य नव्हते. म्हणून मी एकतर थंड ठिकाणी असायचो किंवा मग उष्णतेच्या ठिकाणी थांबायचो.'

  • जर तुम्हाला अभिनेता व्हायचे असेल तर तक्रार करू नका

अमिताभ म्हणाले- 'माझे पात्र असे होते, जो कमरेतून वाकून चालतो. अशा परिस्थितीत माझ्या कंबरेत दुखणे भरले होते.  मी बसू शकत नव्हते आणि नीट झोपूही शकत नव्हतो. पेन किलर्स घेण्याची परवानगी नव्हती, फक्त स्प्रे सोबतीला होता.. ज्याचा काही परिणाम झाला नाही. म्हणून जर तुम्हाला अभिनेता व्हायचे असेल, तर तक्रार करू नका.'

बातम्या आणखी आहेत...