आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटाच्या काळात दिलासा:बिग बींचा विचार - कोरोनाच्या काळात जेवढी सद्भावना मानवांनी मानवांविषयी दाखवली, यापूर्वी कधीच पाहिली नव्हती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी रात्री केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी कोरोनामुळे मानवांमधील अंतर कमी होणे हे दिलासादायक असल्याचे म्हटले आहे.

कोरोना संसर्गामुळे देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्व काही ठप्प झाले आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात. बिग बी ब्लॉग स्पॉट्स, इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर आपले विचार, जनजागृती संदेश आणि वस्तुस्थिती शेअर करत आहेत. सोमवारी रात्री केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी कोरोनामुळे मानवांमधील अंतर कमी होणे हे दिलासादायक असल्याचे म्हटले आहे.  

यापूर्वी कधी झाले नाही : बिग बींनी आपला जुना फोटो आणि अलीकडील फोटोचा कोलाज बनविला आहे, त्यापैकी एका फोटोत ते फोनवर बोलताना दिसत आहेत, तर दुस-या फोटोमध्ये ते फक्त कॉल करण्याची कृती करत आहेत. अमिताभ यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- एक गोष्ट निश्चित आहे; या कोरोना दरम्यान, मानवांनी मानवांविषयी दाखवलेली सद्भावना यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. आपण कोणत्याही देश, प्रांत, समाज, रंग, जात, धर्माचे असो; प्रत्येक बाजूने एकच आवाज येत आहे, प्रत्येकासाठी, प्रत्येकाकडून.... आपण ठीक आहात, सुरक्षित आहात!!

बातम्या आणखी आहेत...