आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी फोडताना दिसले अभिषेक-अमिताभ बच्चन:बिग बींनी दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा, व्हिडिओ शेअर करत म्हणाले - गोविंदा आला रे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आज 19 ऑगस्ट रोजी जगभरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. दरम्यान, बिग बींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा खास व्हिडिओ अमिताभ यांच्या 'खुद्दार' या सुपरहिट चित्रपटातील "मच गया शोर सारी नगरी में" या गाण्याचा आहे, ज्यामध्ये ते दहीहंडी फोडताना दिसत आहेत, तसेच अभिषेक बच्चनच्या हॅपी न्यू इयर या चित्रपटातील दृश्याचाही या व्हिडिओत समावेश आहे. सोशल मीडियावर बिग बींचा हा लेटेस्ट व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अमिताभ बच्चन लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...