आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर स्टारर ‘एक विलेन 2’च्या फायटिंग दृश्यात मोठा बदल, मुंबई- गोव्यात चित्रीत झाले गन फाइट आणि पाठलाग करण्याचे दृश्य

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हार्डकोअर अॅक्शन सिनेमात दाखवले जातील बंदुकीचे आणि पाठलाग करणारे दृश्य

कोरोनानंतर सिने इंडस्ट्रीतही अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळत आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या बजेटबरोबरच त्यांच्या शूटिंगच्या पद्धतीतही बदल केला आहे. खबरदारी घेत ते लवकरात लवकर आपल्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्यास लागले आहेत. आता जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर यांच्या ‘एक विलेन 2’मध्ये कोरोनाला पाहुन एक मोठा बदल करण्यात आला. निर्मात्यांनी हाणामारीचे दृश्य काढून फक्त बंदुकीने लढाई करणे आणि पाठलाग करण्याचे दृश्य ठेवले आहेत. मर्यादित लोकांसोबत हे दृश्य मुंबई आणि गोव्यात चित्रीत करण्यात आले.

  • आधी शूट होणार हाेते हाणामारीचे दृश्य

जॉन अब्राहमच्या निकटवर्तीयांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, चित्रपटातील कलाकार इतर लोकांसोबत एकमेकांना हाताने मारण्याच्या दृश्यासाठी तयार आहेत, मात्र निर्माते जोखीम घ्यायला तयार नाहीत. हा अॅक्शनवर आधारित चित्रपट आहे. आधी गर्दीसोबतच काही अॅक्शन दृश्य चित्रीत केले जाणार होते, मात्र कोरोनाला पाहुन त्यात बदल करण्यात आला. नायक, खलनायक आणि त्यांच्या गुर्गोंमधील हाणामारीचे दृश्य सध्या थांबून ठेवण्यात आले आहेत. त्याच्या ऐवजी बंदुकीने मारणे, पळणे, पाठलाग करणे असे दृश्य शूट केले जात आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सध्या अॅक्शन सीनदेखील सोशल डिस्टेंसिंगने चित्रीत केले जात आहेत.

  • दोन्ही कलाकरांनी वेगवेगळे केले शूटिंग

सूत्राच्या माहितीनुसार, आतापर्यंत गोव्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यापूर्वी मुंबईत फक्त 15 ते 17 दिवसाचे शूटिंग झाले होते. निर्मात्यांनी दोन्ही कलाकारांचे शूट एकत्र घेतले नाही. मुंबईत फक्त जॉन अब्राहमचे शूटिंग करण्यात आले. तर अर्जुनच्या भागाचे दृश्य गोव्यात चित्रीत करण्यात आले. मुंबईतही काही ठिकाणाची निवड करण्यात आली. मात्र त्यात गर्दी नव्हती. फिल्मसिटीच्या एका मैदानात फाइट सीक्वेंस चित्रीत केले गेले. त्यात फक्त चार फायटर्ससोबत एका गाडीत अॅक्शन सीन शूट केले. प्रॉडक्शन हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, टीमने मॉरिशसमध्येही एक शेड्यूल ठेवले होते. मात्र ऐनवेळी त्यात बदल करावा लागला. कारण मॉरिशसही सध्या बंद आहे.

  • आदित्यच्या जागी घेतले अर्जुनला

मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन-अर्जुन व्यतिरिक्त दिशा पटानी आणि तारा सुतारियादेखील दिसणार आहेत. पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे निर्मात्यांनी आतापर्यंत नियोजन केले आहे. खरंतर, आदित्य रॉय कपूरला आधी या चित्रपटात अर्जुनच्या भूमिकेसाठी कास्ट केले गेले होते, पण नंतर दिग्दर्शकाबरोबरच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे अर्जुनला घेण्यात आले.

या चित्रपटात बदलली कामाची पद्धत

  • विपुल अमृतलाल शाह यांनी विद्युत जामवालचा मुख्य अभिनय असलेल्या ‘सनक’चे शूटिंग फक्त 15 लोकांच्या क्रूमेंबर्ससोबत पूर्ण केले.
  • आयुष्मान खुराणा आणि वरुण धवनने उत्तर-पूर्वेकडे सुरक्षित आणि हिरवळ वातावरणात शूटिंग केले.
बातम्या आणखी आहेत...