आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादांमध्ये आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय:चित्रपटाच्या VFX मध्ये कोणताही बदल होणार नाही, 12 जानेवारीला चित्रपटगृहात येणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभास आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट 'आदिपुरुष'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून खूप ट्रोल होत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटाच्या खराब VFX आणि प्रभू राम, हनुमान आणि रावणाचे चुकीचे चित्रण यामुळे मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. प्रेक्षक या चित्रपटात बदल करण्याची मागणी करत आहेत, परंतु मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, निर्मात्यांनी चित्रपटात कोणतेही बदल करण्यास नकार दिला आहे. निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाचा पोस्ट-प्रॉडक्शनचा टप्पा सुरू आहे, त्यामुळे चित्रपटात कोणतेही बदल शक्य नाहीत.

चित्रपटाच्या टीझरला नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दिग्दर्शक ओम राऊत निराश
चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकतेच या चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आम्ही रामायणाच्या कथेशी परिचित आहोत पण आजच्या तरुण पिढीला त्याबद्दल बरेच काही जाणून घ्यायचे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टी कळतील, समजतील. मी प्रभू रामाचा भक्त आहे आणि येणार्‍या पिढीने त्यांचे आदर्श लक्षात ठेवावेत अशी माझी इच्छा आहे." ओम राऊत म्हणतात की चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे मी खूप निराश झालो आहे.

पुढील वर्षी 12 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष पुढील वर्षी १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ओम राऊत यांनी यापूर्वी तान्हाजी आणि सिटी ऑफ गोल्ड या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...