आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण खान यांच्याविरुद्ध कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही 25 डिसेंबर रोजी युएईवरुन भारतात परतले होते. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर ते थेट घरी निघून गेले.
खरं तर नव्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि यूएईवरुन आलेल्या प्रवाशांना 14 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागते. त्यानुसार त्यांचे बुकिंग हे ताज लॅण्डमध्ये करण्यात आले होते. परंतु हे तिघे तिथे गेलेच नाहीत.
हॉटेल ताज लॅण्डमध्ये करण्यात आली होती व्यवस्था
सूत्रांच्या माहितीनुसार, अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांचे बुकिंग हे हॉटेल ताज लॅण्डमध्ये करण्यात आले होते. त्यानुसार 26 डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथे गेलेच नसल्याचे समोर आले. हे तिघेही परस्पर घरी गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी आता या तिघांना भायखाळाच्या रिचर्डसन अँड क्रूडास येथील क्वारंटाईन सेंटरला सुद्धा नेण्यात येणार आहे. 9 जानेवारीपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.