आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Big Release Announcements; More Than 15 Movies Announced Their Release Date On Sunday Including 83, Laal Singh Chaddha, Prithviraj, Jayesh Bhai Jordaar, Shamshera, Bunty Aur Babli2 And Jersey

रिलीज अनाउंसमेंटचा रेकॉर्ड:एका दिवसात 16 चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख जाहीर; जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' यंदा नोव्हेंबरमध्ये तर अक्षयचा 'रक्षाबंधन' पुढील वर्षी 11 ऑगस्टला होणार रिलीज

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणवीर सिंगचा '83' हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होईल, आमिर खान पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेला 'लाल सिंह चड्ढा' घेऊन येणार
  • 2021 च्या शेवटच्या दिवशी शाहिद कपूरचा 'जर्सी' होणार रिलीज, अक्षय कुमार स्टारर 'बच्चन पांडे'ची पुढच्या वर्षी मार्चमध्ये एंट्री
  • अजय देवगणचा 'मेडे' 29 एप्रिलला रिलीज होणार, कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' ला मिळाला मार्चचा शेवटचा शुक्रवार

महाराष्ट्रात येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्याचा निर्णय जाहीर होताच निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रविवार हा चित्रपट क्षेत्रातील मोठा रिलीज अनाउंसमेंट दिवस ठरला. मागील दोन वर्षांपासून थिएटरमध्ये प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या 15 हून अधिक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये 83, लालसिंग चड्ढा, शमशेरा अशा अनेक चित्रपटांची नावे सामिल आहेत.

अक्षय कुमार पुन्हा एकदा ठरणार सबसे बडा खिलाडी
रविवारी यशराज फिल्म्स आणि साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शनसह एकूण 16 चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा सोशल मीडियाद्वारे जाहीर करण्यात आल्या. विशेष गोष्ट म्हणजे रविवारी जाहीर झालेल्या तारखांमध्ये अक्षय कुमारचे सर्वाधिक 6 चित्रपट आहेत.

सूर्यवंशी, राधेश्याम यांची रिलीज डेट झाली जाहीर
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याचा बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय 'राधेश्याम' ची रिलीज डेट 14 जानेवारी 2022 ही जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 'तडप' 3 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होईल. 'चंदिगढ करे आशिकी' हा चित्रपट यावर्षी 10 डिसेंबरला रिलीज होत आहे.

  • या आहेत मोठ्या चित्रपटांच्या रिलीज डेट्स
चित्रपटरिलीज डेटस्टार कास्ट
बंटी और बबली 219 नोव्हेंबर 2021सैफ अली खान, राणी मुखर्जी
सत्यमेव जयते 226 नोव्हेंबर 2021जॉन अब्राहम
चंडीगढ़ करे आशिकी10 डिसेंबर 2021आयुष्मान खुराणा, वाणी कपूर
8325 डिसेंबर 2021रणवीर सिंह, दीपिका पदुकोण
जर्सी31 डिसेंबर 2021शाहिद कपूर
पृथ्वीराज21 जानेवारी 2022अक्षय कुमार, मानुषी छिल्लर
लाल सिंह चड्‌ढा14 फेब्रुवारी 2022आमिर खान, करीना कपूर
जयेश भाई जोरदार25 फेब्रुवारी 2022रणवीर सिंह, शालिनी पांडे
बच्चन पांडे4 मार्च 2022अक्षय कुमार
शमशेरा18 मार्च 2022रणबीर कपूर, संजय दत्त
भूल भुलैया 225 मार्च 2022कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी
KGF 214 एप्रिल 2022यश, संजय दत्त
मेडे29 एप्रिल2022अजय देवगन, रकुल प्रीत
हीरोपंती 26 मे 2022टाइगर श्रॉफ
रक्षाबंधन11 ऑगस्ट 2022अक्षय कुमार, भूमी पेडणेकर
रामसेतु24 ऑक्टोबर 2022अक्षय कुमार

महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची वाईट स्थिती
30 जुलै रोजी देशाच्या बहुतांश भागात चित्रपटगृहे उघडली गेली तेव्हा फक्त हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले. अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'ने 19 ऑगस्ट रोेजी बॉक्स ऑफिसवर खाते उघडले, पण कलेक्शन फारसे चांगले नव्हते. त्याची कमाई एका महिन्यात फक्त 30 कोटी होती. अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे' या चित्रपटाचे कलेक्शन फक्त 2 कोटी राहिले. कंगना रनोटचा 'थलायवी' हा चित्रपट 10 सप्टेंबरला रिलीज झाला पण हाही चित्रपटा आपला करिश्मा दाखवू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...