आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त स्वामी काळाच्या पडद्याआड:‘बिग बॉस’च्या 10 व्या पर्वात झळकलेले स्वामी ओम यांचे निधन, तीन महिन्यांपूर्वी कोरोना तर 15 दिवसांपूर्वी झाला होता अर्धांगवायू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून झळकलेले स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 3 महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार येथे अखेरचा श्वास घेतला.

स्वामी ओम यांचे मित्र मुकेश जैन यांचा मुलगा अर्जुन जैनने सांगितल्यानुसार, कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वामी ओम यांना चालण्यास खूप त्रास व्हायचा. यानंतर त्यांचे अर्धे शरीर निकामी झाले होते. ज्यामुळे गेल्या 15 दिवसांत त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वामी ओम यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्य संस्कार केले जातील.

बातम्या आणखी आहेत...