आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमत्कार!:वयाच्या 19 व्या वर्षी अब्दू रोजिकची अचानक वाढायला लागली उंची, स्वतः फोटो पोस्ट करत म्हणाला - माझी उंची वाढतेय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 16' या शोमुळे तजाकिस्ताचा गायक अब्दू रोजिक प्रसिद्धीझोतात आला. त्याची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. तो त्याच्या कमी उंचीमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्यांची उंची 94 सेमी म्हणजेच 3 फूट 1 इंच आहे. अब्दूने याबद्दल खुलासा करताना सांगतिले होते की, ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे त्याची उंची वाढली नाही. खरं तर यावर उपचार होऊ शकत होते, मात्र त्यावेळी त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे ते उपचार करू शकले नाहीत.

मात्र आता अब्दू रोजिकने त्याच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो कारचे स्टेअरिंग हाताळताना दिसत आहे. अब्दूने त्याची उंची वाढत असल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. अब्दूने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "तुम्हाला फरक दिसतो का? डॉक्टरांनी सांगितलंय की मी आता वाढणार नाही, कारण माझ्याकडे वाढीसाठी लागणारे हार्मोन 0% आहे. अल्हमदुलिल्लाह हा चमत्कार तुमच्या सर्व प्रेम, पाठिंबा आणि प्रार्थना यांचे परिणाम आहे जे मी वाढत आहे. माझी उंची वाढत आहे."

पुढे वाचा, अब्दुलने आयुष्यात पाहिले अनेक चढउतार...

पैशाअभावी झाले नव्हते उपचार
अब्जू रोजिक याचा जन्म 3 सप्टेंबर 2003 रोजी तजाकिस्तानमध्ये झाला. अब्दू आता 19 वर्षांचा आहे पण त्याची उंची खूपच कमी आहे. त्याचे कारण आहे रिकेट्स आजार. हा असा आजार आहे, ज्यामुळे माणसाची उंची वाढत नाही. त्याची उंची कधीच वाढणार नाही हे अब्दूला लहानपणीच माहीत होते. पण आई-वडिलांनी हार न मानता अनेक डॉक्टरांना अब्दूला दाखवले. सर्वांनी नकार दिला. पण आशेचा किरण म्हणून एक डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, अब्दूच्या आजारावर उपचार करता येतील पण खर्च खूप होईल. आर्थिक अडचणींमुळे अब्दूच्या पालकांना त्याच्यावर उपचार करता आले नाहीत.

देवावर नितांत श्रद्धा
आजारानंतरही अब्दुची देवावरील श्रद्धा कमी झाली नाही. एका मुलाखतीत अब्दूने सांगितले होते की, देवावर नितांत श्रद्धा असल्यामुळे त्याने कधीही आशा सोडली नाही. या गोष्टींचे त्याला कधीच दु:ख झाले नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तो नेहमी देवाचा आभारी असतो. मी अजूनही निरोगी आहे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकतो, असे तो म्हणतो.

कमी उंचीमुळे शिक्षण सुटले
कमी उंचीमुळे अब्दूला प्रत्येक वळणावर अडचणींचा सामना करावा लागला. शाळेत असतानाही आजारांनी त्याची पाठ सोडली नाही. एका मुलाखतीत, अब्दूने शाळेशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता. कमी उंचीमुळे त्याला बॅग आणि त्यात ठेवलेली पुस्तके सांभाळता येत नव्हती. बरेच दिवस पाहिल्यावर एके दिवशी शाळेतील शिक्षक म्हणाले की, तुझ्याकडून पुस्तके हाताळली जात नाहीत, त्यामुळे तू शाळेत येऊ नको. यामुळे अब्दूने केवळ 3 वर्षे शालेय शिक्षण घेतले. अब्दुला शाळेतून काढून टाकल्यानंतर शिक्षकाने त्याला पुस्तकेही दिली नाहीत. नंतर अब्दूने स्वतः पुस्तके विकत घेतली आणि घरीच अभ्यास केला.

शाळेतील मुले चेष्ठा करायचे, मारायचे
शाळेची सुरुवातीची वर्षे चांगली गेली पण अब्दू जसजसा मोठा झाला तसतसी परिस्थिती बदलली. शाळेत एकत्र शिकणारी मुलांसोबत अब्दूलाची चांगली मैत्री होती. पण काही सिनियर मुले त्याला खूप त्रास द्यायची. कधी-कधी वाटेत त्याला थांबवून मारहाण करत असे. असे असूनही अब्दूने त्यांच्याबद्दल कधी तक्रार केली नाही. त्याला विश्वास होता की, देव एक दिवस त्याला न्याय देईल.

कुटुंबाचे पोट भरण्यासाठी गाणे सुरू केले आणि स्टार बनला

वयाच्या 7-8 व्या वर्षापासून अब्दूने गाणे सुरू केले आणि त्यातच करिअर करण्याचा विचार केला. अब्दूची अनेक गाणी त्याच्या वाईट दिवसांवर आधारित होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती, त्यामुळे प्रशिक्षण न घेता त्याने बाजारातील रस्त्यावर गाणे सुरू केले. यादरम्यान, एके दिवशी रॅपर बहरूजने त्याच्याकडे पाहिले. अब्दूच्या आवाजाने तो खूप प्रभावित झाला. अब्दूने दुबईला जाऊन गायनात चांगले करिअर करावे, अशी त्याची इच्छा होती. रॅपर बहरूजने यासाठी अब्दूच्या वडिलांशी बोलून अब्दूला दुबईला नेण्यासाठी राजी केले. वडिलांनीही होकार दिला आणि सर्व खर्च उचलून बहरोज त्याला दुबईला घेऊन गेला. दुबईत आल्यानंतर अब्दूने 'ओही दिल जोर' (2019), 'चाकी चक्की बोरान' (2020), आणि 'मोदर' (2021) सारख्या अनेक ताजिकिस्तानी गाण्यांना आवाज दिला.

भारतासोबतही खास नाते
अब्दूने गायक अरिजित सिंगचे एन्ना सोना हे गाणे गायल्यानंतर त्याला भारतात ओळख मिळाली. त्याचे हे गाणे खूप लोकप्रिय झाले. यानंतर अबुधाबीमध्ये एका कार्यक्रमात त्याने सलमान खानची भेट घेतली. तेथे त्याने 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणे गायले, त्यानंतर सलमानने अब्दूची बिग बॉससाठी निवड केली. ए.आर. रहमान यांच्या मुलीच्या लग्नातही अब्दू सहभागी झाला होता. तिथेही त्याने अनेक हिंदी गाणी गायली होते. याशिवाय अब्दूने एआर रहमान यांच्यासोबत एका शोमध्ये मुस्तफा मुस्तफा हे गाणेही गायले होते.