आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते, मात्र आता त्यांनी ब्रेकअपची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दोघांनीही चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
शमिताची पोस्ट
शमिताने लिहिले, 'मी स्पष्ट करु इच्छिते की, राकेश आणि मी आता एकत्र नाही आणि गेल्या काही काळापासून हे असेच आहे. पण हा म्युझिक व्हिडिओ आमच्या सर्व प्रिय चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. तुमच्या प्रेमाचा वर्षाव आमच्यावर असाच करत राहा. तुम्हा सर्वांना प्रेम आणि आभार. आम्ही दोघांनी एक म्युझिक व्हिडिओ शूट केला आहे, जो लवकरच रिलीज होणार आहे."
मी आणि शमिता आता सोबत नाहीत
राकेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाहीत. नशिबाने आम्हाला खूप वेगळ्या परिस्थितीला समोरे नेले आहे. शारा कुटुंबाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. एक खासगी व्यक्ती असल्याने, मला माझ्या ब्रेकअपची सार्वजनिकरित्या घोषणा करायची नव्हती, परंतु मला वाटते की आम्ही आमच्या चाहत्यांना याबद्दल सांगितले पाहिजे."
राकेश पुढे म्हणाला, "मला माहित आहे की हे जाणून तुमचे हृदय तुटेल. मला आशा आहे की, आता तुम्ही आम्हा दोघांवर स्वतंत्रपणे प्रेमाचा वर्षाव करत राहाल. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नेहमीच गरज असेल. हा संगीत व्हिडिओ तुम्हा सर्वांना समर्पित आहे."
'बिग बॉस ओटीटी'मध्ये सुरू झाली होती राकेश-शमिताची लव्ह स्टोरी
करण जोहरचा शो 'बिग बॉस ओटीटी'मध्ये शमिता आणि राकेशची प्रेमकहाणी सुरू झाली होती. या शोमध्ये दोघे अनेकदा एकमेकांशी भांडतानाही दिसले होते. दरम्यान शमिताने खुलासा केला होता की, जेव्हा तिच्या प्रियकराचे निधन झाले तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. त्याचवेळी राकेशनेही कबुली दिली होती की, वडिलांचे निधन आणि रिद्धी डोगरापासून घटस्फोट झाल्यानंतर या सगळ्यातून बाहेर पडणे त्याच्यासाठी खूप कठीण होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.