आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ शुक्लाला लागली लॉटरी:प्रभास आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष'मध्ये सिद्धार्थ साकारणार 'ही' भूमिका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘आदिपुरुष’मध्ये प्रभाससोबत दिसणार अभिेनता सिद्धार्थ शुक्ला

बिग बॉसमधून फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला बॉलिवूडमध्ये मोठी लॉटरी लागली आहे. ओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास-सैफ अली खान स्टारर आगामी आदिपुरुष या चित्रपटात सिद्धार्थ झळकणार असल्यचाी बातमी आहे. हा चित्रपट सिद्धार्थ शुक्लाचा आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, सिद्धार्थ या चित्रपटात रावण आणि मंदोदरीचा मुलगा मेघनादची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. आदिपुरूष’च्या टीमचे सिद्धार्थसोबत फोनवर संपर्क साधून स्क्रीप्टबद्दल बोलणे झाले आहे. सिद्धार्थला ही भूमिका पसंतीस पडल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. सिद्धार्थ खरोखरच ‘आदिपुरुष’ मध्ये दिसला तर त्याच्या चाहत्यांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भेट असेल. या चित्रपटात प्रभास आणि सैफसह कृती सेननची महत्त्वाची भूमिका आहे. श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास आणि रावणाच्या भूमिकेत सैफ झळकणार आहे.

2022 मध्ये हिंदी, तेलगू, मल्याळण आणि कन्नड भाषाते हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मेगा बजेटचा आहे तर याचे शूटिंग शेड्यूलही मोठे आहे. शूटिंग एकूण 150 दिवस होणार. त्यापैकी 60 दिवसाचे शूटिंग आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मुंबईच्या मड आयलँडमध्ये याचे शेवटचे शूटिंग झाले. त्या आधी रिलायन्स स्टुडिओमध्ये शूटिंग झाले होते. आता उर्वरित शूटिंग हैदराबाद येथे होणार आहे.

3 डी तंत्रज्ञान हा या चित्रपटाचा आत्मा
चित्रपटाच्या प्लानिंगविषयी बोलताना दिग्दर्शक ओम म्हणाले होते, 'आम्ही या चित्रपटाचे शूटिंग 3 डी तंत्रज्ञानाने करीत आहोत. आम्ही 'तान्हाजी...' मध्येही या प्रकारचे तंत्र वापरले होते. 'आदिपुरुष' मध्ये आम्ही त्यापेक्षा कित्येक पटीने काम करत आहोत. आम्हाला सात हजार वर्षांपूर्वीची पृथ्वी दर्शवायची आहे. रावण हे जगातील सर्वात कठीण पात्र आहे. यासाठी मी सैफची निवड केली कारण तो प्रत्येक पात्र पूर्ण उत्कटतेने करतो. रावणचे पात्र निगेटिव्ह असून 'तान्हाजी ...' मधील देखील सैफचे पात्र निगेटिव्ह होते.'

ग्राफिक्सच्या मदतीने वाढवली जाईल सैफ-प्रभासची उंची
चित्रपटाविषयी एक खास माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, या चित्रपटात श्रीरामाची उंची 10 फुटाची दाखवली जाईल, ज्याप्रमाणे सात हजार वर्षांपूर्वी रामायणात त्याचा उल्लेख करण्यात आला होता. रावणाची उंची 8 फुट दाखवण्यात येईल. चित्रपटात रामाची भूमिका प्रभास तर रावणाची सैफ अली खान साकारणार आहे. दाेन्ही कलाकारांची उंची पोस्ट प्रॉडक्शनमध्ये ग्राॅफिक्सच्या मदतीने वाढवली जाईल.

350 ते 400 कोटी आहे बजेट
थ्रीडी फॉर्मॅटमध्ये बनत असलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ओम राऊत यांच्याशिवाय भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि राजेश नायर हेदेखील या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बातमीनुसार या चित्रपटाचे बजेट तब्बल 350 ते 400 कोटी इतके आहे.

बातम्या आणखी आहेत...