आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीच्या गाडीला अपघात:'बिग बॉस' फेम अर्शी खानचा दिल्लीत भीषण अपघात, गंभीर जखमी

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा अपघात दिल्लीतील शिवालिक रोडवरील मालविया नगरमध्ये झाल्याचे बोललं जात आहे.

बिग बॉस फेम अर्शी खानच्या गाडीला अपघात झाला आहे. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्शीच्या कुटुंबीयांनी या अपघाताची माहिती दिली आहे.

रुग्णालयात दाखल आहे अर्शी खान
एका मुलाखतीत अर्शी खानच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी अर्शी ही त्या कारमध्येच बसली होती. हा अपघात दिल्लीतील शिवालिक रोडवरील मालविया नगरमध्ये झाला. या अपघातात अर्शी ही गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.'

शेवटची बिग बॉस 14 मध्ये दिसली होती अर्शी

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर अर्शी 'विश' आणि 'सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल' या टेलिव्हिजन शोमध्ये दिसली आहे. ती दिल्लीत तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अर्शी शेवटची बिग बॉस 14 मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली होती. यापूर्वी ती बिग बॉस 11 मध्ये दिसली होती, जिथे ती अनेकदा हितेन तेजवानीसोबत फ्लर्ट करताना दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...