आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या तरुणाची स्वप्नपूर्ती:'बिग बॉस' फेम शिव ठाकरेने खरेदी केली नवीकोरी कार, नारळ वाढवून केली गाडीची पूजा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी 'बिग बॉस 3' चा आणि बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वाचा उपविजेता शिव ठाकरेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बिग बॉस 16 तो विजेता जरी झाला नसला तरी त्याने लोकांची मनं जिंकली आहेत. अमरावतीचा सामान्य तरुण ते आता सेलिब्रिटी असा प्रवास करणाऱ्या शिवची एक बकेट लिस्ट पूर्ण झाली आहे. आणि ती म्हणजे शिवने स्वतःची नवीकोरी आलिशान कार खरेदी केली आहे. शिवचा शोरूममधील नवीन कारची पूजा करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शिवने नारळ फोडून आपल्या नवीन कारची पूजा केली. दोन सेकंड हँड कारनंतर शिवची ही पहिली नवीन कार आहे.

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
समोर आलेल्या व्हिडिओत शिव कारची पूजा करताना तसेच केक कापताना दिसला. शिवचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवला मेहनतीचे फळ मिळाले, देवाचा आशीर्वाद त्याच्यावर कामय राहो, असे एका चाहत्याने म्हटले आहे.

शिव म्हणाला होता - जास्त अ‍ॅव्हरेज देणारी कार घेणार

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवने नवीन कार बूक केल्याचे पापाराझींना सांगितले होते. आज त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. अलीकडेच शिवने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात पापाराझीं त्याला घेरले होते. तेव्हा त्याने नवीन कार घेतल्याचे सांगितले होते. शिव म्हणाला त्याच्याकडे दोन पर्याय होते, त्याने चांगले अ‍ॅव्हरेज देणारी कार घेण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...