आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठीमध्ये मोठा ट्विस्ट:यशश्री झाली बेघर; किरण मानेही घराबाहेर, पण खेळातून बाहेर पडले नाहीत

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसची चावडी चांगलीच रंगली. बिग बॉसने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सदस्यांना धक्का बसला. रविवारच्या भागात यशश्रीच्या एक्सिटनंतर सदस्यांचे टेन्शन वाढले. जवळपास 49 दिवसाच्या प्रवासानंतर यशश्रीला घराबाहेर पडावे लागले. कोणता सदस्य चांगला खेळला, कोण चुकलं, कोणी टास्क उत्तमरीत्या पार पाडला या सगळ्याचा हिशोब सरांनी चावडीवर घेतला. तर अमृता धोंगडेला देखील महेश मांजरेकरांनी सुनावले.

अपूर्वा आणि किरण माने यांच्यात शाब्दिक बाचाबाची बघायला मिळाली. किरण माने म्हणाले, ‘एक वाक्य खूप छान होतं अपूर्वाचं की, अमृता बिग बॉसला खूप हलक्यात घेतेय.' ज्यावर अपूर्वाचे म्हणणे होते, 'मी असं काहीही बोलले नाही, खोटारडा माणूस आहेस तू.

या सगळ्यानंतर तो कठीण क्षण आला ज्यामध्ये घरामधून बाहेर पडणार होता दुसरा सदस्य. आणि त्यासाठी खुद्द महेश मांजरेकर घरामध्ये गेले. किरण माने यांना घराबाहेर पडावे लागले असे सांगण्यात आले. पण महेश सरांनी जाहीर केले की, किरण माने यांचे eviction झाले नाहीये. तसेच बिग बॉस यांनी किरण माने यांना सांगितले तुम्ही घरातून बाहेर पडलला असला तरीदेखील खेळातून बाहेर नाही पडलात.

आता बघूया किरण माने यांना कोणती विशेष पॉवर दिली असेल? काय घडेल पुढे? किरण माने यांची एंट्री सिक्रेट रुममध्ये झाली. या सिक्रेट रुममधून किरण माने सर्व सदस्यांचा गेम, बातचीत, संवाद यावर नजर ठेऊ शकणार आहेत. या पुढचा खेळ अजून रंजक होणार यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...