आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरी रेव्ह पार्टी:'बिग बॉस' फेम हिना पांचाळला पोलिस कोठडी, ड्रग्ज सिंडिकेटच्या अँगलने पोलिस करणार चौकशी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी हिना पांचाळची पोलिस कोठडी संपणार आहे.

इगतपुरी रेव्ह पार्टीत अटक झालेल्या बिग बॉस फेम हिना पांचाळला ड्रग्ज प्रकरणी कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आज तिची पोलिस कोठडी संपणार आहे. नाशिकचे एसपी सचिन पाटील यांनी याची पुष्टी केली आहे. सचिन पाटील म्हणाले, 'चार लोकांना 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ते चौघेही ड्रग्ज सप्लायर आहेत. मंगळवारी हिना आणि इतरांचे वैद्यकीय अहवाल येतील. त्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाईल.'

ड्रग्ज सप्लायरच्या अँगलमधून केली जाईल चौकशी
पोलिसांनी सांगितले- वैद्यकीय अहवालाच्या आधारे एनडीपीएस कायद्याचा कोणता कलम त्यांना लागू होईल याचा निर्णय घेतला जाईल. ज्या लोकांना पोलिसांनी अटक केली ते ड्रग्ज सप्लायर आहेत की नाही, या अँगलनेही चौकशी केली जाणार आहे. हिना पांचाळ हिचीदेखील ती ड्रग्ज सिंडिकेटचा भाग आहे की नाही याची चौकशी केली जाईल.

एका दिवसापूर्वी समोर आली होती बातमी
आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरीमधील एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पाेलिसांनी शनिवारी रात्री 2 वाजता छापा टाकला. काेराेना निर्बंधांचे काेणतेही नियम न पाळता आयाेजित या पार्टीत हिंदी तसेच तेलगू चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला आणि तरुण सहभागी होते. त्यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ व अझार फारनूद या विदेशी महिलेसह दोन कोरिअाेग्राफरचाही समावेश आहे. नायजेरियन ड्रग माफियाच्या सहकार्याने मुंबईमधील एका बड्या बुकीच्या वाढदिवसानिमित्त ही जंगी पार्टी देण्यात आली होती, हुक्का, कोकेन, हेरॉइनचा त्यात मुक्तहस्ते वापर सुरू हाेता.

याप्रकरणी पोलिसांनी 12 महिला आणि 10 पुरुष अशा 22 जणांना अटक केली आहे. पाठाेपाठ मुंबईतून पाेलिसांनी नायजेरियन ड्रग माफियालादेखील अटक केली. त्यांची चाैकशी रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री छापा टाकला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील पीयूष नामक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरीच्या स्काय ताज व्हिला येथे मुंबई व पुण्यातील 10 पुरुष व 12 महिलांची रेव्ह पार्टी आयाेजित करण्यात आली हाेती. 27 जूनला रात्री बारा वाजता वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

कोण आहे हिना पांचाळ?
हिना पांचाळ हिने हिंदी, तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीत अल्पवधीतच नाव कमावले आहे. हिना पांचाळ हिच्या नावावर जास्त चित्रपट नाहीत. मात्र, आयटम डान्सर म्हणून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ‍हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन सारख्या आयटम साँगमध्ये हिना थिरकताना दिसली. याशिवाय बलम बंबई आणि बेवडा बेवडा जालो मी टाइट या गाण्यांसाठी ती लोकप्रिय आहे. 2019 मध्ये बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात हिना सहभागी झाली होती. मात्र अंतिम फेरीत ती धडक मारु शकली नव्हती. फेब्रुवारी 2020 मध्ये मुझसे शादी करोगे या डेटिंग रिअॅलिटी शोमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...