आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सर्वोच्च न्यायालयात सुशांत प्रकरण:रियाच्या दोन याचिकांवर आज सुनावणी, मुंबईत प्रकरण ट्रान्सफर करण्याची मागणी; रिया म्हणाली - बिहार निवडणुकीमुळे सुशांतचे प्रकरण तापवले जातेय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकीय हेतूने बिहार सरकारने या प्रकरणात उडी घेतली आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये रियाने सुशांतचे वडील केके सिंग यांनी दाखल केलेला खटला पाटण्यातून मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. तसेच, बिहार, महाराष्ट्र, केंद्र सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी उपस्थित केलल्या प्रश्नांवर न्यायालय निकाल देईल.

तत्पूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी रिया, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची 10 तास चौकशी केली. सोमवारी पहिल्यांदाच सुशांतच्या रूममेट सिद्धार्थ पिठानीचीही सुमारे सहा तास चौकशी केली गेली.

बिहार निवडणुकीमुळे सुशांतचे प्रकरण तापवले जातेय : रिया चक्रवर्ती

सुशांत सिंहच्या वडिलांच्या तक्रारीवरून बिहारमध्ये दाखल गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे अभिनेत्री रिया चक्रवर्तीने 14 पानांच्या शपथपत्रात म्हटले आहे.

सीबीआयकडे प्रकरण सोपवणे हे बेकायदेशीर

रियानुसार, बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या लोकांचे भावनिक संबंध सुशांतसिंह राजपूतशी आहेत. लोकांच्या भावनांचा वापर मतांसाठी करण्यासाठी राजकीय हेतूने बिहार सरकारने या प्रकरणात उडी घेतली आहे. आधी गुन्हा दाखल केला व नंतर सीबीआय चौकशीची शिफारस केली. ती करण्याचा अधिकार बिहार सरकारला नव्हता.

अभिनेता आशुतोष भाकरे आणि समीर शर्मा यांनीही आत्महत्या केली, पण या दोन्ही प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये काहीच चर्चा रंगली नाही, असा तर्कही रियाने केला.