आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:मदतीसाठी मुंबई पोलिसांकडे गेलेल्या बिहार पोलिसांना धक्काबुक्की, संजय निरुपम म्हणाले - मुंबई आणि बिहार पोलिस एकमेकांना मात देण्यासाठी स्पर्धा करत आहेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी संध्याकाळी बिहार पोलिसांचे अधिकारी या प्रकरणात स्थानिक पोलिसांची मदत घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांसोबत शुक्रवारी संध्याकाळी एक विचित्र घटना घडली. बिहार पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळपासून या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी मुंबईत फिरत होते आणि मीडियाची टीम सर्वत्र त्यांचा पाठलाग करत होती. संध्याकाळी बिहार पोलिसांचे अधिकारी या प्रकरणात स्थानिक पोलिसांची मदत घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी माध्यमांची गर्दीही तेथेही पोहोचली.

गुन्हे शाखा कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचारी जमले होते आणि बिहार पोलिसांची टीम बाहेर येताच मीडियाने त्यांच्याशी बातचित करण्यासाठी त्यांच्याभोवती गराडा घातला. यावेळी, मुंबई पोलिस तेथे आले आणि त्यांनी बिहार पोलिस अधिका-यांना चक्क पोलिसांच्या व्हॅनमध्ये ढकलले. मात्र नंतर त्यांनी आम्ही केवळ बिहार पोलिसांची गर्दीतून वाट काढण्यासाठी मदत करत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मात्र, जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये मुंबई पोलिसांचे लोक बिहार पोलिस अधिका-यांना पकडून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. बिहार पोलिसांसोबत मुंबई पोलिस कैद्यांप्रमाणे वागणूक देत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

  • सुशील मोदींचा दावा - मुंबई पोलिस मदत करत नाहीयेत

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विट करत, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर निःपक्षपाती चौकशीत बाधा आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, बिहार पोलिस चौकशीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, परंतु मुंबई पोलिसांकडून त्यांना सहकार्य मिळत नाहीये. त्यामुळे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे सोपवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • संजय निरुपम म्हणाले- पोलिस एकमेकांना मात देण्यासाठी स्पर्धा करत आहेत

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूचे गूढ मिटविण्यासाठी बिहार आणि मुंबई पोलिसांच्या वागणूकीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सवाल उपस्थित केला आहे. शनिवारी ट्विट करून संजय यांनी दोन्ही राज्यांच्या पोलिसांना लक्ष्य केले. ते म्हणाले की बिहार आणि मुंबई पोलिसांमध्ये चढाओढ सुरु असून एकमेकांना मात देण्यासाठी ते जणू स्पर्धा करत आहेत.

  • बिहार पोलिसांना तीन किलोमीटर चालत जावे लागले

बिहार सरकारचे अ‍ॅडव्होकेट जनरल ललित किशोर यांनी निवेदन जारी केले आहे की, जेव्हा पोलिस एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात तेव्हा राज्य सरकार सहकार्य करते. पण हे दुर्दैव आहे की मुंबई पोलिस तसे करत नाहीत. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना गाडीही पुरविली नाही आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांना गुरुवारी 3 किमी चालत जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...