आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरोईन बनण्यासाठी उपोषणाला बसल्या होत्या बीना राय:पहिल्याच चित्रपटानंतर प्रेमनाथसोबत लग्न, मधुबालासोबत होते खास कनेक्शन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण आयुष्य स्वतःच्या अटींवर जगणारी अभिनेत्री म्हणजे बीना राय. अतिशय देखण्या बीना राय या भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा काही महिलांपैकी एक होत्या ज्या सर्वकाही स्वतःच्या अटीवर करत असत. त्यांनी कधीही कुणाच्या दबावाखाली काम केले नाही.

1940-45 च्या काळात भारतात महिलांनी चित्रपटात काम करणे अत्यंत वाईट मानले जात होते, तेव्हा बीना राय चित्रपटात काम करण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या विरोधात उपोषणाला बसल्या होत्या. 1951 मध्ये त्यांचा पहिलाच चित्रपट आला आणि त्या स्टार बनल्या. नवीन चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली. पण त्यानंतर बीना यांनी लग्नाचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ज्या दिवशी बीना राय यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच दिवशी त्यांचा अभिनेते प्रेमनाथ यांच्याशी साखरपुडा झाला होता.

'अनारकली' या क्लासिक लव्हस्टोरीमध्ये त्या अनारकलीच्या भूमिकेत झळकल्या. त्यावेळी त्या सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्री होत्या. 1950-60 च्या दशकात त्यांना एका चित्रपटासाठी 1.5 लाख रुपये मिळायचे, परंतु जेव्हा त्यांचे करिअर यशोशिखरावर होते, तेव्हा त्यांनी कुटुंब आणि मुलांसाठी बॉलिवूडला रामराम ठोकला.

आज बिना राय यांची आज 13 वी पुण्यतिथी आहे. 5 किश्श्यांमधून जाणून घेऊया बीना राय यांची संपूर्ण कहाणी...

पहिला निर्णय - चित्रपटांसाठी कुटुंबाचा विरोध पत्करला
बीना राय यांचे खरे नाव कृष्णा सरीन होते, त्यांचा जन्म 13 जुलै 1931 रोजी लाहोर (पंजाब), ब्रिटिश भारत येथे झाला. हिंसाचारामुळे त्यांचे पंजाबी कुटुंब लाहोर सोडून कानपूर (उत्तर प्रदेश) येथे स्थायिक झाले. बीना अभ्यासात हुशार होत्या. लाहोरमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लखनऊच्या आयटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

इसाबेल थोरन कॉलेजमध्ये शिकत असताना बीना यांची अभिनयाकडे रुची वाढू लागली आणि त्या नाटकांमध्ये काम करू लागल्या. एकदा त्यांना बॉम्बे (आता मुंबई) येथे होणाऱ्या टॅलेंट हंट स्पर्धेबद्दल माहिती मिळाली.

विजेत्याला 25,200 रुपयांचे रोख बक्षीस आणि त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते किशोर साहू यांच्या चित्रपटात नायिका बनण्याची संधी दिली जाणार होती. बीना यांनी त्यांच्या कुटुंबीयांना बॉम्बेला जाण्याविषयी सांगताच त्यांना खूप राग आला. प्रत्येक जण त्यांच्या निर्णयाच्या विरोधात होते. घरच्यांनी साफ नकार दिल्याने बिना रागाच्या भरात उपोषणाला बसल्या. अखेर कुटुंबीयांनी होकार दिला आणि त्यांना मुंबईला जाण्याची परवानगी देण्यात आली. येथे बीना या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आणि आणि 25 हजारांचे बक्षीस जिंकले. त्यांना किशोर साहूंच्या 'काली घटा' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

बीना राय यांच्यासाठी त्यांची जन्मतारीख अतिशय खास होती. आपल्या आयुष्यातील काही मोठ्या निर्णयांसाठी त्यांनी हीच खास तारीख निवडली.

दुसरा निर्णय - पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी लग्न करण्याचा निर्णय

बिना राय चित्रपटात येताच प्रेमनाथच्या प्रेमात पडल्या. पहिलाच चित्रपट हिट झाला आणि त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, पण त्याचवेळी त्यांनी प्रेमनाथ यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. बीना यांचा डेब्यू चित्रपट 'काली घटा'च्या रिलीजपूर्वीच 'औरत' चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अनेक चित्रपट प्रदर्शित होणार होते, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीना यांनी लग्न आणि प्रेमाला प्राधान्य दिले.

बीना राय आणि प्रेमनाथ यांचा विवाह 2 सप्टेंबर 1952 रोजी झाला.

मधुबाला आणि योगायोग
त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्यावर प्रेमनाथ यांचे प्रेम होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नाचा घरच्यांचा विरोध होता. प्रेमनाथ आणि बीना यांच्या लग्नाची बातमी मधुबालाला मिळताच त्यांची प्रकृती ढासळली होती. 2 सप्टेंबर 1952 रोजी त्यांच्या लग्नाच्या दिवशी मधुबालाची तब्येत इतकी बिघडली की प्रेमनाथ खूप चिंतीत झाले होते. बीना यांना या सर्व गोष्टींची जाणीव होती आणि त्यांनी प्रेमनाथ यांच्या भावनांचा आदर केला. 1996 मध्ये सिनेप्लॉटला दिलेल्या मुलाखतीत बीना यांनीच ही गोष्ट उघड केली होती.

1953 मध्ये आलेल्या 'अनारकली' चित्रपटात बीना राय यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती आणि त्यांना बरीच प्रशंसा मिळाली होती. प्रेमनाथच्या आयुष्यात मधुबालाची जागा बीना यांनी घेतली असेल, पण 1960 मध्ये जेव्हा 'मुघल-ए-आझम' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मधुबालाने अनारकलीचा टॅग मिळवला. तेव्हापासून मधुबालाला अनारकली म्हणून ओळख मिळाली. 'मुघल-ए-आझम' रिलीज झाला तेव्हा अनारकली बनलेल्या मधुबालाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळणार होता, पण 1961 मध्ये बीना राय यांना 'घुंघट' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. असे त्यांचे मधुबालाशी खास कनेक्शन होते.

तिसरा निर्णय - मोठे चित्रपट नाकारले
कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांना बीना राय यांना त्यांच्या चित्रपटांसाठी साइन करायचे होते. त्यांना 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देवदास' या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला. याशिवाय 1954 मध्ये आलेला 'नागिन' हा चित्रपट देखील त्यांनी नाकारला होता. हे दोन्ही चित्रपट वैजयंतीमाला यांच्याकडे गेले, या चित्रपटांमुळे वैजयंती माला स्टार बनल्या. 'मुघल-ए-आझम'मध्येही त्यांना दिलीप कुमारसोबत अनारकलीची भूमिका साकारण्याची संधी मिळणार होती, पण त्यांनी ती ऑफरही धुडकावून लावली. 'मुघल-ए-आझम' हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे.

चौथा निर्णय - नवऱ्यासोबत पडद्यावर जोडी अपयशी ठरली तर पुन्हा एकत्र काम केले नाही

लग्नानंतर प्रेमनाथ यांनी पीएन फिल्म्स ही प्रोडक्शन कंपनी सुरू केली. या प्रोडक्शन अंतर्गत त्यांनी बिना यांना आपल्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये नायिका बनवले आणि स्वतः नायक बनले. दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'औरत' हा चित्रपट आधीच फ्लॉप झाला होता. यानंतर 'शगुफा' (1953), 'गोलकुंडा का कैदी' (1954) आणि 'समुंदर' हे चित्रपटही फ्लॉपच्या यादीत जमा झाले. सातत्याने अपयश आल्याने बीना यांनी प्रेमनाथसोबत काम करणे सोडून दिले. त्याचवेळी त्यांनी अशोक कुमारसोबत 'शोले', 'सरदार', 'तलाश बंदी', 'दादी माँ', भारत भूषणसोबत 'मेरा सलाम', अभिनेता अजितसोबत 'मरीन ड्राइव्ह', देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्यासोबत 'इन्सानियत'सारखे हिट चित्रपट दिले.

पाचवा निर्णय - पती आणि मुलांसाठी चित्रपट सोडले
लग्नाच्या दोन वर्षानंतर 1953 मध्ये बीना राय चित्रपटांपासून दुरावल्या, परंतु यामागील कारण प्रेमनाथ नव्हते. बीना राय यांची त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींमध्ये गणना व्हायची. त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी 1.5 लाख रुपये मानधन दिले जात होते.

बीना राय यांनी सिनेप्लॉटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, प्रेमनाथ यांनी त्यांच्यावर कधीही चित्रपट सोडण्यासाठी दबाव आणला नाही किंवा त्यांनी तिला काही करण्यापासून रोखले नाही. चित्रपट सोडण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. मुले झाल्यावर बीना यांना घराची जबाबदारी सांभाळताना घर आणि चित्रपट यांच्यात समतोल साधणे कठीण जात होते. त्यांनी आपल्या पतीला सांगितले की, दोघांपैकी एकाला घरी राहावे लागेल. त्यावेळी प्रेमनाथ यांचे करिअर यशोशिखरावर होते. तर बीना यांच्याकडे कमी काम होते. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार चित्रपटांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. 'वल्लाह क्या बात है' हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता. मात्र, चित्रपट सोडल्यानंतरही त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत राहिले.

पती प्रेमनाथ आणि मोठा मुलगा प्रेम किशनसोबत बिना राय.
पती प्रेमनाथ आणि मोठा मुलगा प्रेम किशनसोबत बिना राय.

काही वर्षांनंतर बीना राय यांना चित्रपटांमध्ये परतायचे होते, परंतु वाढत्या वयाबरोबर त्यांना त्यांच्या आवडीच्या भूमिका मिळणे बंद झाले. काही चित्रपट नक्कीच मिळाले, पण त्यांच्या आवडीची भूमिका न मिळाल्याने त्यांनी कधीही पुनरागमन केले नाही.

बातम्या आणखी आहेत...