आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री बिपाशा बसूला कन्यारत्न:मुलीचे नाव ठेवले 'देवी बसू सिंग ग्रोव्हर', सोशल मीडियावर शेअर केली बाळाची पहिली झलक

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आई झाली आहे. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. 12 नोव्हेंबर रोजी बाळाचा जन्म झाला. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची बातमी दिली. सोबतच एक खास फोटो शेअर करत त्यांनी आपल्या लेकीचे नावही उघड केले आहे. 'देवी बसू सिंग ग्रोव्हर' असे त्यांनी आपल्या लेकीचे नाव ठेवले आहे. शेअर केलेल्या फोटोत बाळाचे पाय दिसत आहेत.

बिपाशा आणि करण या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दोघेही आपल्या बाळासाठी खूप उत्सुक होते, अखेर लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याची प्रतीक्षा संपली.

मुलीची इच्छा पूर्ण झाली

बाळाच्या जन्माआधी बिपाशाने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिला मुलगी व्हावी, अशी तिची इच्छा आहे, असे म्हटले होते.

ऑगस्टमध्ये केली होती प्रेग्नेंसीची घोषणा
बिपाशाने बसूने यावर्षी ऑगस्टमध्ये आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. बिपाशाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर करत लिहिले होते, "आमचे बाळ लवकरच आमच्या आयुष्याचा आणि आनंदाचा एक भाग होणार आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आमच्या आयुष्याचा एक भाग होत्या आणि नेहमीच राहतील, दुर्गा दुर्गा," असे ती म्हणाली.

एप्रिल 2016 मध्ये झाले होते दोघांचे लग्न
30 एप्रिल 2016 रोजी बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. दोघे 'अलोन'च्या सेटवर भेटले होते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर करण आणि बिपाशाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिपाशा करणची तिसरी पत्नी आहे. त्याआधी करणने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते, परंतु त्याची दोन्ही लग्नं फार कमी काळ टिकले नाही.

बातम्या आणखी आहेत...