आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहे. यंदाचा बिपाशाचा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास आहे. कारण आई झाल्यानंतर ती तिचा पहिला वाढदिवस साजरा करतेय. लग्नानंतर 6 वर्षांनी बिपाशाने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव तिने देवी असे ठेवले आहे. दरम्यान बिपाशाचा वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा पती करण सिंह ग्रोव्हरने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर बिपाशासोबतचा एक खास फोटो शेअर करत करण म्हणतो, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो प्रकाशासारखी तू चमकत राहो. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, हा वर्षातील सर्वोत्तम दिवस आहे. माझ्या बोलण्यापेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव, माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस."
नवऱ्यापेक्षा सात पटीने श्रीमंत आहे बिपाशा
बिपाशा गेल्या सहा वर्षांपासून एकाही चित्रपटात झळकलेली नाही. 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' या चित्रपटात ती शेवटची झळकली होती. याच चित्रपटात करण सिंह ग्रोव्हर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. चित्रपटसृष्टीपासून दूर बिपाशा लक्झरिअस आयुष्य जगताना दिसते. संपत्तीच्या बाबतीत बिपाशा तिचा पती करणपेक्षा तब्बल सात पट अधिक श्रीमंत आहे. बिपाशाचे एकुण संपत्ती जवळपास 111 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते, तर करण 15 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
इंडस्ट्रीपासून दूर असूनही बिपाशा मोठी कमाई करते. ती अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करते. रिबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, फा डियोड्रेंट, गिली ज्वेलरी, कॅडिला शुगर फ्री गोल्ड, हेड अँड शोल्डर शँपूसह अनेक कंपन्यांसाठी तिने जाहिराती केल्या आहेत. याद्वारे तिने मोठी कमाई केली आहे.
बिपाशाने वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये आपले करिअर सुरू केले होते. ती आतापर्यंत 40 हून अधिक मॅगझिन कव्हर पेजवरही झळकली आहे. बिपाशाचे मुंबईच्या पॉश भागात दोन फ्लॅटही खरेदी केले आहेत. या फ्लॅटची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. याशिवाय कोलकातामध्येही तिचा आलिशान बंगला आहे. बिपाशाच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी 7, पोर्शे, फोक्सवॅगन आणि बीटल सारख्या लग्झरी गाड्या आहेत.
एप्रिल 2016 मध्ये झाले होते दोघांचे लग्न
30 एप्रिल 2016 रोजी बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. दोघे 'अलोन'च्या सेटवर भेटले होते. बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केले होते. एक वर्ष डेट केल्यानंतर करण आणि बिपाशाने लग्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.