आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू दीर्घकाळापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. बिपाशाचा जन्म नवी दिल्लीत एका बंगाली कुटुंबात झाला. कालांतराने बिपाशा आणि तिचे कुटुंब कोलकाता येथे शिफ्ट झाले.
शालेय जीवनात बिपाशा हुशार विद्यार्थिनी होती. मात्र मॉडेलिंग जगात प्रवेश केल्यानंतर तिने आपले शिक्षण अर्धवट सोजले होते. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी बिपाशाने गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली आणि अल्पावधीतच यशाची चव चाखली.
लहानपणापासूनच टोमणे ऐकले
बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने आपली आपबीती सांगितली होती. ती म्हणाली होती,, 'मी लहानाची मोठी होत असताना अनेकदा ऐकले की बोनी सोनीपेक्षा काळी आहे. ती थोडी सावळी आहे ना? माझी आईसुद्धा डस्की ब्युटी होती आणि मीही ब-याच अंशी तिच्यासारखीच दिसते. माझे नातेवाईक यावर चर्चा का करतात हे मला कधीच कळले नाही.'
नावासोबत जुळला सावळा रंग
पुढे बिपाशाने लिहिले होते, ''मी 15, 16 वर्षांची असताना मॉडेलिंगला सुरुवात केली. मी सुपर मॉडल स्पर्धा जिंकली. प्रत्येक वृत्तपत्रात बातमी होती की, कोलकाताची सावळी मुलगी विजेती ठरली आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटले की, माझ्या नावाचे पहिले विशेषण सावळी हे का आहे. मग मी मॉडेलिंगसाठी न्यूयॉर्क आणि पॅरिसला गेले आणि मला येथे समजले की माझ्या रंगामुळे मला अधिक काम आणि अटेंशन मिळत आहे. हा माझा वेगळा शोध होता.''
माझ्या कामापेक्षा सावळ्या रंगाची अधिक चर्चा
''मी परत आल्यावर मला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. शेवटी मी माझा पहिला चित्रपट केला, मी इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे नवीन होते. अचानक मला येथे स्वीकारले गेले आणि पसंतही केले गेले. परंतु, सावळ्या मुलीने पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले, असं विशेषण जुळले. माझ्यावर आलेल्या बर्याच लेखांमध्ये माझ्या कामापेक्षा माझ्या रंगाची जास्त चर्चा होती. मला ते कधीच समजले नाही. माझ्या मते आकर्षक हे व्यक्तीमत्त्व असतं, रंग नव्हे. माझ्या सावळ्या रंगामुळे का मला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे समजले गेले? मला जास्त फरक समजत नाही परंतु लोक बनवतात'', असे ती सांगते.
मी कधीच थांबली नाही
''एखाद्या अभिनेत्रीने कसे दिसावे आणि कसे वागावे, यासाठी येथे सौंदर्याची एक मानसिकता आहे. पण मी वेगळे होते. लहानपणापासूनच माझ्यात आत्मविश्वास आणि अभिमान आहे. माझा त्वचेचा रंग मला परिभाषित करीत नाही. मला ते आवडते आणि मी ते बदलू इच्छित नाही'', असे मत बिपाशाने व्यक्त केले.
अनेक सौंदर्य प्रसाधन कंपन्यांची ऑफर नाकारली
बिपाशाने सांगितले, गेल्या 18 वर्षांत मला सर्व मोठ्या बजेटच्या स्किन केअर एंडोर्समेंटच्या ऑफर मिळाल्या होत्या, परंतु मी माझ्या तत्त्वांवर ठाम राहिले. हे थांबवणे आवश्यक आहे. आम्ही विक्री करीत आहोत ते एक खोटे स्वप्न आहे. देशातील बहुतेक लोकसंख्या सावळी आहे. हा ब्रँडचा एक मोठा निर्णय आहे आणि इतरांनीही तो स्वीकारला पाहिजे, असेही ती म्हणाली.
बिपाशा बसूने 2001 मध्ये दोन चित्रपट नाकारल्यानंतर अजनबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात नकारात्मक भूमिका असूनही तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. 2002 मध्ये आलेला 'राज' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.