आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिन्याची झाली बिपाशा-करणची मुलगी देवी:केक कापून केले सेलिब्रेशन, लग्नाच्या 6 वर्षानंतर झाले आई-बाबा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर गेल्या महिन्यात एका मुलीचे आईबाबा झाले. 12 नोव्हेंबरला बिपाशाने मुलीला जन्म दिला होता. नुकतीच त्यांची लाडकी देवी एक महिन्याची झाली आहे. यानिमित्ताने बिपाशाने एक खास व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात बिपाशा पती करण सिंग ग्रोवरसोबत देवीचा वन मंथ बर्थडे सेलिब्रेट करताना दिसतेय.

बिपाशा-करणने साजरा केला लेकीचा वन मंथ बर्थडे

व्हिडिओत बिपाशा आणि करण एकत्र केक कापताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले, "आणि देवी एक महिन्याची झाली आहे. देवीला आशीर्वाद आणि प्रेमाच वर्षाव करणाऱ्या सर्वांचे आभार. आम्ही खूप आभारी आहोत... दुर्गा दुर्गा." यावेळी करण काळ्या टी-शर्टमध्ये तर बिपाशा पांढऱ्या रंगाच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. बिपाशा सोशल मीडियावर तिच्या मुलीचे फोटो शेअर करत असते, मात्र अद्याप तिचा चेहरा जगाला दाखवण्यात आलेला नाही. या लेटेस्ट व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

6 वर्षांनंतर आईबाबा झाले बिपाशा-करण
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची पहिली भेट 2015 मध्ये भूषण पटेलच्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर झाली होती, त्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. 2016 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नाच्या 6 वर्षांनी दोघे आई-वडील झाले आहेत. अलीकडेच, बिपाशाने तिच्या मुलीच्या नावाबद्दल खुलासा करणारी एक पोस्ट शेअर करत मुलीचे नाव देवी का ठेवले, याविषयी खुलासा केला होते. बिपाशाने सांगितल्यानुसार, माँ वैष्णोदेवीच्या दिव्य दर्शनानंतर देवीचा जन्म झाला आणि म्हणून तिने आपल्या मुलीचे नाव 'देवी' ठेवले.

बातम्या आणखी आहेत...