आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशा बसूचे डोहाळे जेवण:आईने काढली दृष्ट, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले शाध विधीचे फोटो आणि व्हिडिओ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री बिपाशा बसूने अलीकडेच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. बिपाशा दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडे तिने तिचे बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 8 सप्टेंबर रोजी बिपाशाच्या घरी बेबी शॉवर सेरेमनी आयोजित करण्यात आली होती, जी बंगाली रितीरिवाजांनुसार पार पडली.

शाध विधी म्हणजे काय?

डोहाळे जेवणाचा विधी बंगाली पद्धतीने पार पडला. याला शाध विधी म्हणतात. गरोदर महिलेसाठी तिच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक हा विधी आयोजित करत असतात. शाध विधी स्त्रीच्या गरोदरपणाच्या पाचव्या किंवा सातव्या महिन्यात केला जातो. या विधीदरम्यान होणा-या आईसाठी पूजा केली जाते आणि तिला आशीर्वाद दिले जातात. याशिवाय गरोदर महिलेचा आवडता पदार्थ तयार केला जातो. बंगाली संस्कृतीत या विधीला खूप महत्त्व आहे.

बिपाशा गुलाबी बनारसी साडीत दिसली

बेबी शॉवर सोहळ्यादरम्यान बिपाशा खूपच सुंदर आणि एलिगंट दिसली. तिने गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली होती. यासह तिने सोन्याचे दागिने घातले होते. चाहत्यांना बिपाशाचा हा पारंपरिक लूक खूपच सुंदर वाटला. फोटोंमध्ये बिपाशाच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.

बिपाशाने आईसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत

सोशल मीडियावर बिपाशाने तिच्या आईसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मला तुझ्यासारखी आई व्हायचे आहे, लव्ह यू आई.' याशिवाय बिपाशाने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती विधी पूर्ण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बिपाशाची आई तिची दृष्ट काढताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेत्री व्हिडिओमध्ये विधीनुसार जेवण करताना दिसत आहे.

चाहत्यांना आवडले बिपाशाचे फोटो

बिपाशाच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले - तू खूप सुंदर दिसतेय. तर आणखी एका चाहत्याने लिहिले – तू जगातील सर्व आनंदास पात्र आहेस, खूप सुंदर! देव तुला, करण आणि तुझ्या मुलाला आशीर्वाद देवो. याशिवाय अनेक चाहतेही या कपलवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...