आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Birtday Special: Rejecting Hema Malini, The First Director Had Said – You Cannot Become An Actress, Then Raj Kapoor Declare Her A Star

ड्रीम गर्लचे न ऐकलेले किस्से:हेमा मालिनी यांना रिजेक्ट करत दिग्दर्शकाने म्हटले होते - 'तू अभिनेत्री होऊ शकत नाही', मग राज कपूर यांची नजर पडताच बनल्या स्टार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेमा यांच्यावर ओरडायचे दिग्दर्शक

बॉलिवूडची 'ड्रीमगर्ल' अर्थातच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 ऑक्टोबर 1948 रोजी चेन्नईच्या अम्मनकुडी येथे जन्मलेल्या हेमा यांनी 1963 मध्ये तामिळ फिल्म 'इधु साथियम'द्वारे आपल्या अभिनय करिअरचा श्रीगणेशा केला होता. ड्रीम गर्लच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी...

हेमा यांनी वयाच्या 14 व्या वर्षी इंधु साथियम या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. या चित्रपटाशी निगडीत एक गोष्ट आजही हेमा विसरु शकल्या नाहीत. फिल्ममेकरने एकदा मंचावर हेमा यांचा डान्स बघितला होता. तो डान्स बघून ते इम्प्रेस झाले होते आणि त्यांनी हेमा यांना त्यांच्या चित्रपटासाठी साइन केले. चित्रपटात हेमा यांची भूमिका स्टेजवर मैत्रिणींसोबत डान्स करण्याची होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हेमा त्यांच्या आजोबांसोबत (आईचे वडील) चित्रपट बघायला गेल्या. पण चित्रपटातील हेमा यांचा संपूर्ण रोलच कट करण्यात आल्याचे बघून त्या हैराण झाल्या. त्यानंतर त्या हमसून हमसून रडल्या होत्या.

पहिल्याच चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते
तामिळ दिग्दर्शक सीवी श्रीधर यांनी हेमा मालिनी यांना मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांच्या चित्रपटात घेतले होते. चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले होते. पण काही दिवसांनी दिग्दर्शकाने तू खूप बारीक आहेस आणि अभिनेत्री होऊ शकत नाही, असे कारण देत त्यांना चित्रपटातून काढून टाकले होते. चित्रपटातून काढून टाकल्याने हेमा डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या.

राज कपूर यांना कॉपी केल्यानंतर मिळाला होता पहिला बॉलिवूड चित्रपट
हेमा यांनी 1968 मध्ये ‘सपनों के सौदागर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटात राज कपूर यांना कॉपी करावे लागले होते, त्यानंतरच त्यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला होता. एका मुलाखतीत हेमा यांनी याविषयी सांगितले होते, ''स्क्रीन टेस्टसाठी मला आरके स्टुडिओत बोलावण्यात आले होते. मी तेथे पोहोचली तेव्हा दिग्दर्शक महेश कौल यांच्यासोबत स्वतः राज साहेब तिथे हजर होते. महेशजींच्या माध्यमातून मी राज साहेबांकडे विनंती केली, त्यांनी मला नेमके काय करायचे आहे, हे अभिनय करुन दाखवावे, म्हणजे मला नेमके काय करायचे हे मला समजेल. माझे बोलणे ऐकून महेशजी हैराण झाले होते. पण राज साहेब म्हणाले होते, ''काही हरकत नाही, तिला ठाऊक नाही, त्यामुळे मी करुन दाखवतो.'' राज कपूर यांनी तेव्हा ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटातील एका संवादावर अभिनय करुन दाखवला होता, हा संवाद पद्मिनी कोल्हापुरेने चित्रपटात म्हटला होता. राज साहेबांनी ज्या नजाकतने संवाद म्हटला, तसाच हुबेहुब अभिनय हेमा यांनीही केला. हेमा म्हणतात, ''मी राज साहेबांची नकल करुन पास झाली आणि मला ‘सपनों के सौदागर’साठी फायनल करण्यात आले होते.''

हेमा यांच्यावर ओरडायचे दिग्दर्शक
राज कपूर यांना कॉपी करुन हेमा मालिनी यांना चित्रपट मिळाला खरा, पण त्यांच्या अडचणी अजून संपल्या नव्हत्या. दिग्दर्शक महेश यांच्याविषयी हेमा यांनी सांगितले होते, "ते कायम माझ्यावर ओरडत असायचे. पण ते खूप चांगले व्यक्ती होते. माझ्या चुकांवर ते मला ओरडायचे. मी माझ्या आईला म्हणायची,‘मला मद्रासला परत घेऊन चल.'' जेव्हा ही गोष्ट महेशजींना समजली, तेव्हा त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावले आणि म्हणाले, ''बेटा तू डान्समध्ये कुशल आहेस, मला एक सांग जर एखाद्याला हाक मारायची असेल, तर ती भरतनाट्यममधून कशी देशील?’ माझ्या हाताचे इशारे बघून ते म्हणाले, ‘फक्त, हेच तुला तोंडाने बोलायचे आहे.’ बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या हेमा यांनी हळूहळू संवाद शैली आणि अभिनयात पारंगत झाल्या.

हेमा मालिनी अशा एक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पाच कपूर म्हणजेच राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले.

बातम्या आणखी आहेत...