आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते जॉनी वॉकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पडद्यावर ते दिसताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचे. जॉनी वॉकर यांना पाहून ते एक नंबरचे दारुडे असतील, असे सगळ्यांना वाटायचे. पण खऱ्या आयुष्यात जॉनी वॉकर यांनी कधीच दारूला हात लावला नाही. त्यांनी 300 चित्रपटांत काम केले मात्र कोणत्याच सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली नाही. जॉनी यांनी त्यांची सह-अभिनेत्री शकीलाची बहीण नूरजहाँशी लग्न केले. नूर आणि जॉनी वॉकर यांना 3 मुले आणि 3 मुली आहेत.
आज जॉनी वॉकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयीचे किस्से जाणून घ्या...
गरिबीमुळे शिक्षण सोडावे लागले 11 नोव्हेंबर 1926 रोजी मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये जन्मलेल्या जॉनी वॉकर यांचे बालपणीचे नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी होते. बालपणीच ते 10 भाऊ-बहिणींसोबत मुंबईला आले होते. मुंबईत आल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी केली. यासाठी त्यांना 26 रुपये मिळायचे. लहानपणापासूनच लोकांची नकल करत सर्वांना हसवण्यात ते तरबेज होते. बसमध्येदेखील ते प्रवाशांना हसवत असत. असेच एकदा अभिनेते बलराज साहनी यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांची विनोदीशैली बलराज यांना आवडली. त्यांनी लगेच काझींची गुरुदत्त यांच्याशी भेट घालून दिली आणि अशा प्रकारे काझी सिनेजगतात आले. त्यांची दारुड्याची भूमिका पाहून गुरुदत्त यांनी त्यांचे नाव जॉनी वॉकर ठेवले. हेच नाव बरेच यशस्वी ठरले. गरिबीमुळे जॉनी यांना सहावीनंतरच शिक्षण सोडावे लागले होते. बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर जॉनी यांनी आपल्या सर्व मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले होते.
पहिल्यांदा अभिनयासाठी मिळाले होते 5 रुपये
कंडक्टर म्हणून काम करताना जॉनी यांना फिल्म स्टुडिओत जायची संधी मिळायची. गुरुदत्त यांच्या 'बाजी’ चित्रपटात काम करण्याआधी जॉनी वॉकर चित्रपटात ज्युनियर कलाकाराच्या रूपात काम करत होते. तेव्हा त्यांना गर्दीत उभे राहण्यासाठी पाच रुपये मिळत होते, मात्र एक्स्ट्रा सप्लायर त्यातून आपले एक रुपयाचे कमिशन कापून त्यांच्या हातात 4 रुपये देत होते. यादरम्यान जॉनी वॉकर यांची भेट चित्रपट जगतातील प्रसिद्ध खलनायक एनए अन्सारी आणि के. आसिफचे सचिव रफिक यांच्याशी झाली. सुमारे 7-8 महिन्यांच्या संघर्षानंतर जॉनी वॉकर यांना 'आखरी पैगाम' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. ज्यासाठी त्यांना 80 रुपये मिळाले होते.
दारुड्याचा अभिनय केल्याने गुरुदत्त यांना आला होता राग
जॉनी एकदा दारुड्याची भूमिका वठवत होते. पण जॉनी दारु पिऊन भूमिका करत असल्याचे गुरु दत्त यांना वाटले, त्यामुळे ते खूप रागावले होते. मात्र, जेव्हा जॉनी अभिनय करत असल्याचे कळले त्यांना कळले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. यानंतर त्यांनी 'बाजी'मध्ये जॉनी यांना भूमिका दिली.
गुरु दत्त यांनी त्यांच्या आवडत्या व्हिस्की ब्रँडवरून ठेवले "जॉनी" हे नाव
जॉनी वॉकरचे नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी हे होते. गुरु दत्त यांना भेटण्यापूर्वी पर्यंत लोक त्यांना याच नावाने ओळखत होते. परंतु जॉनी जेव्हा गुरू दत्त यांना भेटला तेव्हा त्यांची दारुड्या व्यक्तीची भूमिका बघून ते प्रभावित झाले. आणि त्यांनी त्यांच्या आवडत्या व्हिस्की ब्रँडवरून त्यांचे नाव "जॉनी वॉकर" ठेवले. जॉनी यांनीही हेच स्क्रीन नाव ठेवले.
किस्सा 'सर जो तेरा चकराय' या गाण्यात कास्ट होण्याचा
1957 मध्ये रिलीज झालेल्या 'प्यासा'मध्ये गुरू दत्त यांनी जॉनी वॉकर यांना त्यांचे पात्र विजयचा स्वार्थी मित्र श्यामची भूमिका दिली होती. परंतु जॉनी वॉकर यांच्यावर काही दृश्ये शूट केल्यानंतर त्यांना जाणवले की, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या विनोदी कलाकाराला निगेटिव्ह भूमिकेत बघायला आवडणार नाही. म्हणून त्यांनी ही भूमिका श्याम कपूर नावाच्या अभिनेत्याला दिली आणि अशा प्रकारे जॉनी वॉकर यांना दुसरे पात्र मिळाले. आणि त्यांच्यावर गाजलेले 'सर जो तेरा चकराये' हे गाणे चित्रीत करण्यात आले.
रविवारची सुट्टी घेणारा पहिला अभिनेता
चित्रपटसृष्टीत सुट्टी नसते. अशा परिस्थितीत जॉनी वॉकर हे चित्रपटसृष्टीतील पहिले असे सहाय्यक अभिनेता होते ज्यांनी रविवारची सुट्टी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी जॉनीकडे कामाची कमतरता नव्हती, त्यांना दररोज चित्रपटाचे शूटिंग करावे लागत असे. दरम्यान, त्यांनी रविवार हा दिवस कुटुंबासोबत घालवण्याचा निर्णय घेतला आणि रविवारची सुट्टी घेण्यास सुरुवात केली. तसेच, जॉनी हे पहिले अभिनेता आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये टॅक्सी चालकांची भाषा वापरण्यास सुरुवात केली.
गुलजार यांच्या सांगण्यावरून केला ‘चाची 420’
जॉनी वॉकर यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता. एका मुलाखतीत जॉनी म्हणाले होते, माझ्यासाठी लोकांनी भूमिका लिहिणे बंद केले होते त्यामुळे मी चित्रपटापासून दूर झालो. चित्रपटातून थोडी उसंत घेऊन मुलांचे पालनपोषण करण्याचे मी आधीपासून ठरवले होते. गुलजार यांच्या सांगण्यावरून 14-15 वर्षानंतर त्यांनी 'चाची 420' स्वीकारला.
‘आनंद’मध्ये रुमालाने झाकला चेहरा
जॉनी यांची ओळख एक प्रसिद्ध विनोदवीर म्हणून झाली होती. त्यामुळे त्यांनी 'आनंद’मध्ये इसाभाई सुरतवालाची भूमिका साकारताना चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना सांगून एका दृश्यात बदल करून घेतला होता. खरं तर, चित्रपटाच्या शेवटी राजेश खन्ना यांनी साकारलेल्या पात्राचा मृत्यू होतो. तेव्हा जॉनी भेटायला जातात आणि रडत बाहेर येतात. त्यानंतर अमिताभ बच्चन जातात. हे दृश्य बदलण्याचे त्यांनी ऋषिदांना सांगितले होते. ते म्हणाले होते, मी जेव्हा रडत बाहेर येईन तेव्हा चेहऱ्यावर रुमाल ठेवून येईन. कारण मी एक कॉमेडियन आहे आणि हे दृश्य खूपच भावुक आहे. लोकांना वाटेल की मी अभिनयच करत आहे आणि मला रडताना पाहून ते हसतील.
लोकांना हसवण्यातच सुख मिळते पुढे जॉनी यांनी 'आर-पार’, 'प्यासा’, 'कागज के फूल’, 'आदमी’, 'नया दौर’, 'मेरे महबूब’, 'हंगामा’, 'मेरा दोस्त मेरा दुश्मन’, 'शान’ आणि 'चाची 420’ सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवले. जॉनीसाहेबांना विनोदी भूमिका प्रचंड आवडायच्या. लोकांना हसविण्यात ते आनंद मानत. 1955 मध्ये जॉनीसाहेबांनी अभिनेत्री शकिला बानोची बहीण नूर बानो यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना 3 मुले आणि 3 मुली आहेत. नासिर खान अभिनयात आहे, इतर सर्व अमेरिकेत सेटल झाले आहेत. 29 जुलै 2003 रोजी जॉनी यांचे मुंबईत निधन झाले.
काही न ऐकलेल्या गोष्टी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.