आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव कपूर यांचा वाढदिवस:राजीव कपूर यांनी आर्किटेक्ट आरती यांच्यासोबत केले होते लग्न, पण दोन वर्षातच झाला घटस्फोट, एकटेच काढले आयुष्य

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजीव यांचे वैयक्तिक जीवन खूप अस्थिर होते.

ऋषि कपूर आणि रणधीर कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर यांचा आज वाढदिवस आहे. राजीव कपूर यांनी 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या एक जान हैं हम या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र त्यांना खऱी ओळख 1985 मध्ये आलेल्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून मिळाली होती. नाग नागिन आणि अंगारे या चित्रपटातही त्यांनी मुख्य भूमिका वठवली होती. याशिवाय त्यांनी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय स्टारर आ अब लौट चलें या चित्रपटाची निर्मिती केली होती. 1986 मध्ये आलेल्या ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित स्टारर प्रेम गंथ हा चित्रपट राजीव यांनी दिग्दर्शित केला होता.

याचवर्षी 9 फेब्रुवारी रोजी वयाच्या 58 वर्षी त्यांचे निधन झाले. राजीव यांना हार्ट अटॅक आला होता. राजीव यांना अपत्य नव्हते. ते एकटेच आयुष्य काढत होते. खरंतर राजीव यांचे वैयक्तिक जीवन खूप अस्थिर होते.

2 वर्षे टिकला संसार
राजीव यांनी 2001 मध्ये आर्किटेक्ट आरती सभरवालशी लग्न केले. लग्नानंतर आरती आणि राजीव यांचे जमू शकले नाही. 2003 साली दोन वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आरती कॅनडाला शिफ्ट झाल्या. तर घटस्फोटानंतर राजीव यांनी पुन्हा लग्न केले नाही आणि अविवाहित राहिले.

राजीव कपूर यांनी 1983 साली 'एक जान है हम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण त्यांचे करिअर विशेष उंचीवर गेले नाही. राजीव यांनी 'लवर बॉय', 'हम तो चले परदेस', 'अंगारे', 'शुक्रिया' यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या, मात्र ते बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत.

पद्मिनी कोल्हापुरेंसोबत जोडले नाव
राजीव यांनी प्रेम रोगमध्ये डायरेक्टर राज कपूर यांच्यासोबत असिस्टेंट म्हणून काम केले होते. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे ऋषी कपूरसोबत प्रमुख भुमिकेत होत्या. चित्रपटाच्या शूटिंदरम्यान राजीव आणि पद्मिनी यांची मैत्री झाली. दोघांनी खूप वेळ एकत्र घालवला.

असे बोलले जाते की, राज कपूर यांना हे आवडले नाही आणि त्यांनी पद्मिनी यांना इशारा दिला की, राजीवपासून दूर राहा किंवा चित्रपट सोडून द्या. पद्मिनी यांनी त्यांचे ऐकले आणि चित्रपटावर लक्ष केंद्रित केले आणि राजीवपासून दूर झाल्या.

बातम्या आणखी आहेत...