आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसरत जहांच्या मुलाच्या वडिलांचे नाव आले समोर:निखिल जैन नव्हे अभिनेता यश दासगुप्ता आहे नुसरत जहांच्या मुलाचा वडील, जन्मदाखल्यावरुन झाला खुलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुसरत यांचा मुलगा ईशान जे दासगुप्ताचा जन्म 26 ऑगस्ट 2021 रोजी झाला.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांच्या मुलाचे वडील कोण आहेत यावरुन सुरु असलेल्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. मुलाच्या जन्मदाखल्यानुसार देबाशीष दासगुप्ता हे त्यांच्या मुलाच्या वडिलांचे नाव आहे. नुसरत यांचा मुलगा ईशान जे दासगुप्ताचा जन्म 26 ऑगस्ट 2021 रोजी झाला.

नुसरत आणि यश दासगुप्ता यांच्या मुलाचा जन्म दाखल्याच्या नोंदणीचे डिटेल्स सार्वजनिक झाले आहे. कोलकाता नगर निगममध्ये झालेल्या नोंदीमध्ये वडिलांचे नाव देबाशिष दासगुप्ता असे लिहिण्यात आले आहे. हे यश दासगुप्ता याचे अधिकृत नाव आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की नुसरत जहाँ यांच्या मुलाच्या वडिलांचे नाव यश दासगुप्ता आहे.

अभिनेत्री नुसरत यांच्या प्रेग्नंसीवरून खूप चर्चा झाली. कारण नुसरत अनेक महिन्यांपासून त्यांचे पती निखिल जैन यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या. नुसरत आणि निखिल हे एकमेकांपासून वेगळे होत असल्याची बातमी आल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू असतानाच नुसरत यांच्या प्रेग्नेंसीची बातमी आली होती. नुसरतच्या प्रेग्नंसीबाबत आपल्या काहीच माहिती नसल्याचे निखिल जैनने स्पष्ट केले होते.

पतीबरोबर झाला वाद
निखिल जैन आणि नुसरत गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून वेगळे राहत आहेत. दोघांच्या नातेसंबंधावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यानंतर नुसरत यांनी माध्यमांसमोर येऊन निखिलसोबतचे त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आणि सोबतच निखिल जैनवर त्यांनी पैशांचा गैरव्यवहार आणि फसवणुकीचा आरोप केला होता. 2019 मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केले होते. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले.

नुसरत यांनी एक निवेदन जारी करत स्पष्ट केले होते की, त्यांचे लग्न टर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दोन वेगवेगळ्या धर्मातील लोकांचे हे लग्न होते. त्यामुळे त्याची स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी होणे गरजेचे होते, पण ते कधीच झाले नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...