आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांचा झाला करण जोहर:वार्षिक 100 कोटींहून अधिकची करतो कमाई, 30 कोटींचे आलिशान घर आणि लग्झरी गाड्यांचा आहे मालक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया करणच्या लक्झरी लाइफस्टाइलविषयी -

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर आज 50 वर्षांचा झाला आहे. करणचा जन्म 25 मे 1972 रोजी यश जोहर यांच्या घरी झाला. करणचे वडील यश जोहर हे एकेकाळचे प्रसिद्ध निर्माते आणि धर्मा प्रॉडक्शनचे संस्थापक होते. दूरदर्शनचा टीव्ही शो 'इंद्रधनुष'मधून करणने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. 1995 मध्ये करणने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये आदित्य चोप्राला असिस्ट केले होते, या चित्रपटात करणचीही छोटी भूमिका होती. मात्र अभिनय हा आपला प्रांत नाही, हे करणला समजले. आणि 1998 मध्ये त्याने कुछ कुछ होता है या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले ज्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आजवर करण जोहरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे, त्यासाठी त्याला डझनभर मोठे पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, करण त्याचा चॅट शो कॉफी विथ करण आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. त्याची लक्झरी लाइफस्टाइल आणि छंदांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलशी संबंधित काही रंजक गोष्टी -

एकेकाळी टीव्ही शोमध्ये काम करणारा करण 200 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच 1450 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

करण जोहर हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. तो प्रत्येक चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी 3-4 कोटी रुपये आकारतो.

करण जोहरने त्याच्या एकूण संपत्तीतून 480 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. करण हा नॉर आणि टाटा सारख्या मोठ्या कंपनीच्या जाहिरातीचा भाग आहे. प्रत्येक जाहिरातीसाठी तो 2 कोटी रुपये मानधन घेतो.

करण जोहर मुंबईच्या कार्टर रोड येथे सी-फेसिंग फ्लॅटमध्ये राहतो, जो त्याने 2010 मध्ये खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत 32 कोटी रुपये आहे. मुंबईतील मलबार हिल्सस्थित करणचे आलिशान घरही 20 कोटींचे आहे.

करण जोहर 7-8 कोटींच्या लक्झरी गाडयांचा मालक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये BMW745, BMW760, Mercedes S Class यांचा समावेश आहे.

गूच्ची, प्राडा, लूई वित्तों, डोल्ची गबाना, वर्साचे हे करणचे आवडते ब्रँड आहेत. करण नुकतेच 95 हजार रुपये किमतीचे वर्साचे स्नीकर्स विकत घेतले होते.

लॉकडाऊन दरम्यान, करणने त्याच्या वॉर्डरोबचे अनेक व्हिडिओ शेअर केले, ज्यात लाखो किमतीचे ब्रँडेड कपडे, शूज आणि सामान होते. करणच्या बहुतेक ब्रँडेड जॅकेटची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त आहे. अनेकवेळा तो 2-3 लाखांच्या बॅगसह स्पॉट झाला आहे.

23 कोटी रुपये टॅक्स भरणारा करण हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

करणने नुकतेच भारतीय लष्कर सेवेला 5 कोटी रुपये दान केले.

2015 मध्ये करण जोहरने दक्षिण चित्रपट 'बाहुबली'चे हिंदी हक्क विकत घेतले होता, ज्याची डील प्रॉफिट शेअरवर झाली होती.

बातम्या आणखी आहेत...