आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Birthday: Neha Used To Perform In Jagrate In Childhood For A Few Rupees, Today She Is The Top Singer Of The Industry With Assets Of 38 Crores

हॅपी बर्थडे:गरिबीमुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून जगरातामध्ये भजन गायची नेहा, आज आहे 38 कोटींच्या संपत्तीची मालकिण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2008 मध्ये लाँच केला स्वतःचा अल्बम

आपल्या सुमधूर आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. नेहाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. तिचे आई-वडील जगरता करून घराचा उदरनिर्वाह भागवायचे. घरची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की, नेहानेही वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच कुटुंबियांसोबत स्टेजवर गाणे गायला सुरुवात केली होती. एक काळ असा होता जेव्हा नेहा संपूर्ण कुटुंबासह भाड्याच्या एका खोलीत राहायची. आज नेहा इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी गायिकांपैकी एक असून करोडोंच्या घरात राहते. 500 रुपयांपासून करिअरची सुरुवात करणारी नेहा 38 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकिण आहे. ती प्रत्येक गाण्यासाठी सुमारे 8-10 लाख रुपये आकारते.

आज वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया तिचा संघर्षापासून ते यशस्वी गायिका होण्यापर्यंतचा प्रवास कसा राहिला -

नेहा कक्करचा जन्म 6 जून 1988 रोजी ऋषिकेशमध्ये झाला. तिला एक मोठी बहीण सोनू आणि एक लहान भाऊ टोनी आहे. ऋषिकेशमध्ये नेहा एका भाड्याच्या खोलीत दोन भावंडे आणि आई-वडिलांसोबत राहत होती. हलाखीची परिस्थिती अशी होती की, त्यांच्या घरात स्वयंपाकघरही नव्हते. अशा परिस्थितीत आईने एकमेव खोलीत टेबल ठेवून ते स्वयंपाकघर बनवले होते.

नेहा दोन वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब ऋषिकेशहून दिल्लीला स्थलांतरित झाले. नेहाचे वडील शाळेबाहेर फिरत समोसे विकायचे. पण घर खर्च भागवणे कठीण झाले तेव्हा त्यांनी जागरण, जगराता आणि स्टेजवर कार्यक्रम करायला सुरुवात केली.

नेहाची मोठी बहीण सोनू ज्या शाळेत शिकायची त्या शाळेबाहेर तिचे वडील समोसे विकायचे. शाळकरी मुलांनी अनेकदा यावरुन तिची चेष्टा केली होती. त्यामुळे सोनूने तिची शाळा बदलली होती.

आर्थिक चणचणीमुळे वयाच्या चौथ्या वर्षी गाणे सुरू केले
दिल्लीत असताना नेहा तिच्या आईवडिलांसोबत जगरातांमध्ये हभागी होऊ लागली. नेहाने वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षी गायला सुरुवात केली होती. जागरतांसाठी या कुटुंबाला 500 रुपये मिळायचे.

मोठी बहीण सोनू कक्करसोबत परफॉर्म करताना नेहा कक्कर.
मोठी बहीण सोनू कक्करसोबत परफॉर्म करताना नेहा कक्कर.

वयाच्या 16व्या वर्षी भावासोबत मुंबईला पोहोचली
2004 मध्ये नेहा तिचा लहान भाऊ टोनी कक्करसोबत मुंबईला पोहोचली. येथे तिने सिंगिग कॉम्पिटिशनसाठी अनेक वेळा ऑडिशन दिली. अखेर 2006 साली नेहाला इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. नेहाचा टॉप-12 स्पर्धकांच्या यादीत समावेश झाला होता, पण ती अगदी सुरुवातीलाच बाहेर पडली. या सीझनमध्ये संदीप आचार्य विजेता ठरला होता. आज नेहा स्वतः इंडियन आयडॉल शोमध्ये जज म्हणून दिसते.

2008 मध्ये लाँच केला स्वतःचा अल्बम
नेहाने 2008 मध्ये मीत ब्रदर्सच्या सहकार्याने तिचा स्वतःचा अल्बम 'नेहा द रॉकस्टार' लाँच केला. नेहाने त्याच वेळी रोमियो ज्युलिएट अल्बम रेकॉर्ड केला. नेहाने मीराबाई नॉट आउट (2008) मध्ये सुखविंदर सिंगसोबत गाणे गाऊन बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ब्लू (2009) या चित्रपटात नेहाला कोरस गायनाची संधी मिळाली होती.

'इंडियन आयडॉल 2' मधून मिळाली ओळख
नेहाने इंडियन आयडॉल या सांगितिक रिअॅलिटी शोमधून आपली ओळख निर्माण केली. या शोची सर्वात लहान स्पर्धक नेहा लवकरच शोमधून बाहेर पडली. आणि नंतर याच शोची जज म्हणून ती झळकली. नेहाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांसाठी कोरसमध्ये गायन केले होते. नंतर तिला 'ना आना इस देश मेरी लाडो' या मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाली. येथून तिच्या करिअरला दिशा मिळाली.

इंडियन आइडॉल 2 च्या सेटवर नेहा
इंडियन आइडॉल 2 च्या सेटवर नेहा

अभिनय आणि कॉमेडी क्षेत्रातही हात आजमावला
नेहाने 2010 मध्ये 'इसी लाइफ में' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती. त्याचबरोबर तिने कपिल शर्मा आणि अली अजगरसोबत कॉमेडी सर्कसमध्येही काम केले. नेहाला 2010 पर्यंत बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळू शकले नाही, मात्र तिला कन्नड, तेलुगू चित्रपटातील गाण्यांमध्ये काम मिळू लागले.

इसी लाइफ में चित्रपटातील एका दृश्यात
इसी लाइफ में चित्रपटातील एका दृश्यात

'कॉकटेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक
2012 मध्ये नेहा कक्करला 'कॉकटेल' चित्रपटात प्रीतमचे 'सेकंड हँड जवानी' हे गाणे गाण्याची संधी मिळाली. या गाण्याने नेहाला बॉलिवूड इंडस्ट्रीत एक ओळख दिली. यानंतर नेहाने बोतल खोल, जादू की झप्पी, धतिंग नाच, मनाली ट्रान्स, लंडन ठुमकगा यांसारखी हिट गाणी देऊन लोकांची मने जिंकली. तेव्हापासून आजपर्यंत नेहाने चार्टबस्टर गाणी दिली आणि कधीही मागे वळून पाहिले नाही.

38 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे नेहा
नेहा कक्कर 5 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 38 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. नेहा प्रत्येक गाण्यासाठी 8-10 लाख रुपये घेते. ती इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि महागड्या गायकांपैकी एक आहे. स्टेज परफॉर्मन्ससाठी नेहा 20-25 लाख रुपये घेते.

एका खोलीच्या भाड्याच्या घरात गेले बालपण
नेहा कक्करने 2020 मध्ये ऋषिकेश येथे बंगला खरेदी केला. याच शहरातील एका भाड्याच्या खोलीत नेहाचे बालपण गेले होते. आपल्या इंस्टाग्रामवरून नेहोने तिच्या बंगल्याची आणि जुन्या घराची छायाचित्रे शेअर केली होती. तिने सांगितले की, या भाड्याच्या एका खोलीत जिथे तिची आई टेबल लावून त्याचा वापर किचनप्रमाणे करायची. जेव्हा या जुन्या घराला बघते तेव्हा खूप इमोशनल होते, असे नेहा म्हणाली होती. नेहा सध्या मुंबईतील पॅनोरमा टॉवरच्या प्राइम लोकेशनवर राहते. तिच्या घराची किंमत 1.2 कोटी आहे. नेहाच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू-7 आणि बीएमडब्ल्यूचा समावेश आहे.

ऋषिकेशमध्ये 2020 मध्ये खरेदी केला होता आलिशान बंगला.
ऋषिकेशमध्ये 2020 मध्ये खरेदी केला होता आलिशान बंगला.

रिलेशनशिप आणि ब्रेकअपमुळे एकवटली होती चर्चा
नेहा कक्कर 2014 पासून अभिनेता हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. याचा खुलासा नेहाने स्वतः नॅशनल टेलिव्हिजनवर केला होता. दोघेही लवकरच लग्न करणार होते, मात्र या घोषणेनंतर तीन महिन्यांनी दोघेही विभक्त झाले. हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा डिप्रेशनमध्ये होती. अनेकवेळा ती शोमध्ये भावूक होतानाही दिसली होती.

पती रोहनप्रीतसोबत नेहा कक्कर
पती रोहनप्रीतसोबत नेहा कक्कर

2020 मध्ये रोहनप्रीतसोबत लग्न करून दिला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का
नेहा कक्करने 24 ऑक्टोबर 2020 रोजी रोहनप्रीत सिंगसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. नेहा आणि रोहन यांची भेट एका म्युझिक टूर दरम्यान झाली होती. काही भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही महिन्यातच त्यांनी लग्न केले.

बातम्या आणखी आहेत...