आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे चिची:तीन मुलांचे वडील असते गोविंदा! टीनापूर्वी झाला होता मुलीचा जन्म, खरी ठरली होती आईची भविष्यवाणी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंदाने 1987 मध्ये सुनीतासोबत झाले.

गोविंद अरुण अहुजा उर्फ अभिनेता गोविंदाने आज वयाची 57 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत जन्मलेल्या गोविंदाने रुपेरी पडद्यावर लोकांना खूप हसवले आणि सोबतच भावूकही केले. गोविंदाच्या रिल लाईफविषयी त्याच्या चाहत्यांना बरेच काही ठाऊक आहे, मात्र त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या नाहीत. आता हेच बघा ना, टीना (नर्मदा) गोविंदाची मोठी मुलगी असल्याचे लोकांना ठाऊक आहे. मात्र टीनापूर्वी गोविंदाला अजून एक मुलगी होती. मात्र चार महिन्यांची असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला होता.

स्वतः गोविंदाने उघड केली ही खासगी गोष्ट
गोविंदाने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील हा इमोशनल क्षण शेअर केला होता. तो म्हणाला होता, "मी माझ्या कुटुंबात 11 मृत्यू पाहिले आहेत. यामध्ये माझ्या मुलीचाही समावेश आहे. माझी थोरली मुलगी चार महिन्यांची असताना तिचा मृत्यू झाला होता. ती प्रीमॅच्युअर बेबी होती. मुलीसोबतच माझे वडील, आई, दोन भाऊ, मेव्हणे आणि बहिणीचा मृत्यू मी पाहिला आहे. यांच्या मुलांना मीच लहानाचे मोठे केले आहे. कारण त्यांची कंपनी बंद पडली होती आणि त्यांच्याकडे काम नव्हते. याकाळात माझ्यावर बरेच इमोशनल आणि फायनॅन्शिअल प्रेशर होते."

खरी ठरली होती आईची भविष्यवाणी
गोविंदाच्या मातोश्रींनी जी जी भविष्यवाणी केली, ती खरी ठरल्याचे गोविंदाने सांगितले. तो म्हणाला. "मी 17 वर्षांचा असताना आईने म्हटले होते, की वयाच्या 21 व्या वर्षी कमाल करेल आणि त्याच वर्षी माझा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 50 दिवसांनी मी 49 सिनेमे साईन केले होते."

मुलगी आणि स्वतःच्या मृत्यूची केली होती गोविंदाच्या आईने भविष्यवाणी
गोविंदाने सांगितले होते, "जेव्हा माझी आई प्रोग्राममध्ये जात होती, तेव्हा माझी काळजी पद्मा जीजी (कृष्णा अभिषेकची आई) घेत होती. एके दिवशी आई म्हणाली होती, की मुलीच्या जन्मानंतर पद्मा जीजीचा मृत्यू होईल. माझ्या बहिणीला कॅन्सर होता आणि आरती (कृष्णाची बहीण) त्यावेळी गर्भात होती. मुलीच्या जन्मानंतर बहिणीचे निधन झाले. एकेदिवशी आईने स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आणि तीन महिन्यांनंतर तिचाही मृत्यू झाला." जेव्हा गोविंदाच्या आईचा मृत्यू झाला होता, तेव्हा त्याच्या 'हीरो नंबर वन' या सिनेमाचे शूटिंग सुरु होते.

दोन मुलांचे वडील आहे गोविंदा
गोविंदाने 1987 मध्ये सुनीतासोबत झाले. पहिल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यांना दोन मुलं झाली. मुलगी नर्मदाने सिनेमांत पदार्पणाच्या वेळी स्वतःचे नाव बदलून टीना अहुजा केले. तिचा पहिला सिनेाम 'सेकंड हँड हसबंड' कधी रिलीज झाला आणि कधी पडद्यावरुन गायब झाले, हे कुणालाही कळले नाही. गोविंदाच्या मुलाचे नाव यशवर्धन आहूजा असून तो लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणारेय.

बातम्या आणखी आहेत...