आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे स्पेशल:जया बच्चनमुळे मोडले होते करिश्मा कपूर-अभिषेकचे लग्न, करिश्माला मान्य नव्हती 'ही' अट  

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज करिश्मा कपूरचा वाढदिवस असून तिने वयाच्या 47 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

अभिनेता अभिषेक बच्चनचे ऐश्वर्या रायपूर्वी करिश्मा कपूरसोबत लग्न जुळले होते. दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. पण करिश्माच्या होणा-या सासूबाई अर्थातच अभिषेकची आई जया बच्चन यांच्यामुळे हे लग्न मोडले. आज (25 जून) करिश्माच्या 46 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला अभिषेक-करिश्माचे लग्न नेमक्या कोणत्या कारणामुळे होऊ शकले नाही, याविषयी सांगत आहोत.

  • असे जुळले होते करिश्मासोबत अभिषेकचे सूत

आज अभिषेक बच्चन माजी जगतसुंदरी ऐश्वर्याचा पती आहे. परंतु अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली. श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. लग्नादरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. त्याचकाळात अभिषेकला 'रेफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती. असे म्हटले जाते, की करीना सेटवर अभिषेकला भावोजी म्हणून हाक मारायची. करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.

  • जया बच्चन यांच्या एका अटीमुळे तुटले अभिषेक-करिश्माचे नाते

अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले. परंतु दोघांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली.दोघांचा साखरपुडा झाला. अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेसृष्टीत काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे वृत्त लगेचच आले. ही अट करिश्मा आणि तिची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती.

  • बबिता यांना पसंत नव्हता अभिषेक

असेही म्हटले जाते की, करिश्माची आई बबीताला अभिषेक आवडत नव्हता. तरीदेखील करिश्माने त्याच्यासोबत साखरपुडा केला. त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते. तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती. बबीता यांना भिती वाटायची, की अभिषेक कधीच यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही तर... अखेर करिश्मा आई पुढे झुकली आणि तिने स्वत: हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात वाद झाल्याचेही म्हटले जाते.

  • दिल्लीच्या व्यावसायिकासोबत करिश्माने केले होते लग्न...

अभिषेकसोबत लग्न मोडल्यानंतर काही महिन्यांतच करिश्माने घटस्फोटित संजय कपूरसोबत लग्न थाटले. पण करिश्मा आणि संजयचे नाते काही वर्षेच टिकले. दोघांचा घटस्फोट झाला आहे. संजय कपूरने आरोप लावला होता, की करिश्माने पैशांसाठी अभिषेक बच्चनशी लग्न मोडून माझ्याशी लग्न केले होते. करिश्माला समायरा आणि कियान राज ही मुले आहेत. तर अभिषेकला एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे. संजय कपूरपासून विभक्त झाल्यानंतर करिश्मा आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. अधूनमधून ती वेब सीरिजमध्ये दिसत असते. 

बातम्या आणखी आहेत...